सांगली :- जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा आता आयपीएस तुषार दोशी यांनी अधिकृतपणे स्वीकारली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले असून, सांगलीतील गुन्हेगारी विश्वात आता मोठी खळबळ उडाली आहे. शांत सांगलीला लागलेली गुन्हेगारीची वाळवी उपटून टाकण्याचे सर्वात मोठे आव्हान आता नव्या 'कॅप्टन'समोर असणार आहे.
गुन्हेगारीचे 'काटा' काढणार की मोडणार?
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेली टोळीयुद्धे, खुनाचे सत्र आणि अवैध धंद्यांनी डोकं वर काढलं आहे. वाळू तस्करीपासून ते मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांपर्यंत पसरलेलं जाळं उद्ध्वस्त करणं हे नव्या एसपींसमोर पहिलं लक्ष्य असेल. तुषार दोशी यांच्या शिस्तप्रिय आणि आक्रमक कार्यशैलीमुळे आता गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
या ५ प्रमुख आव्हानांचा होणार 'Correct Program':
१. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नशा उतरवणे: मोक्का आणि तडीपारीची अस्त्रे वापरून गुन्हेगारांची कंबरडे मोडण्याचे आव्हान.२. अवैध धंदे उद्ध्वस्त करणे: छुप्या पद्धतीने चालणारे वाळू उपसा आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर 'सर्जिकल स्ट्राईक' करणे.३. महिलांची सुरक्षा: कॉलेज परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी रोडरोमिओंचा बंदोबस्त करून महिलांना सुरक्षित वातावरण देणे.४. सायबर गुन्हेगारीला लगाम: वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी तांत्रिक विभागाला अधिक सक्षम करणे.५. कोम्बिंग ऑपरेशनचा धडाका: संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून रात्रीची गस्त अधिक कडक करणे.
'सांगली दर्पण'चा सवाल: आता बदलाची लाट येणार का?
जनतेची अपेक्षा आहे की, नवीन एसपी केवळ गुन्हेगारांवरच नाही, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशांवरही कारवाई करतील. तुषार दोशी यांनी पदभार घेताच आपल्या कामाचा श्रीगणेशा केला असून, येत्या काही दिवसांत सांगलीच्या गुन्हेगारी नकाशावर पोलिसांचा 'खाकी दरारा' दिसणार हे नक्की! "सांगली जिल्ह्यात कायद्याचे राज्य असेल. जो कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल, त्याला पोलीस आपल्या भाषेत उत्तर देतील. जनतेने निर्भय राहावे!"
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.