Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली FDA ॲक्शन मोडमध्ये: 'पनीर अॅनालॉग' विक्रीबाबत नियमावली कडक, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी मोठा निर्णय.

सांगली FDA ॲक्शन मोडमध्ये: 'पनीर अॅनालॉग' विक्रीबाबत नियमावली कडक, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी मोठा निर्णय


हॉटेलच्या मेन्यू कार्डवर आता 'चीज अॅनालॉग'चा उल्लेख अनिवार्य; अन्यथा होणार कठोर कारवाई! ​बनावट पनीर/चीजला चाप: हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 'पनीर' किंवा 'चीज'च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या 'अॅनालॉग' पदार्थांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंबर कसली आहे. ​काय आहे 'अॅनालॉग'?: शुद्ध पनीर दुधापासून बनते, तर 'डेअरी अॅनालॉग' हे खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून बनवले जाते. हे दिसायला पनीरसारखे असले तरी ते 'चीज अॅनालॉग' प्रवर्गात येते.

प्रशासनाचे आदेश: मेन्यु कार्ड, बिल आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर 'चीज अॅनालॉग'चा स्पष्ट उल्लेख असावा. ​खरेदी करताना हॉटेल चालकांनी बिलावर मालाचे खरे स्वरूप तपासावे.  परवाना घेताना दिलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल स्वतःचाच असावा, त्रयस्थ व्यक्तीचा असल्यास कारवाई होईल.

​सहाय्यक आयुक्त रा. अ. समुद्रे यांचे आवाहन: "ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल." ​तक्रार कोठे करावी? जर तुमची फसवणूक होत असेल, तर अन्न व औषध प्रशासनाच्या खालील पत्त्यावर संपर्क साधा:
टोल फ्री क्रमांक: १८००-२२२-३६५
​ई-मेल: fdasangli@gmail.com

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.