Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तुषार दोशींनी अधिकारांचा गैरवापर करून केल्या बदल्या; पत्राद्वारे गंभीर आरोप"

"तुषार दोशींनी अधिकारांचा गैरवापर करून केल्या बदल्या; पत्राद्वारे गंभीर आरोप"


नुकतेच सांगलीला बदली झालेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप झाले असून ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलीच्या दिवशीच साताऱ्यातील सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. "दोशी यांनी त्यांच्या अधिकाराबाहेर जाऊन बदल्या केल्या असून त्या नियमबाह्य आहेत," असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. 
तुषार दोशी यांची काही दिवसांपूर्वीच साताऱ्यावरून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. त्यापूर्वी ते सक्तीच्या रजेवर असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र बदलीचे आदेश मिळालेल्याच दिवशी त्यांनी या बदल्या केल्याने संशय निर्माण झाला आहे. 

दरम्यान, साताऱ्यातील त्यांच्या कारकीर्दीवर यापूर्वीही वाद झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या भूमिकेबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. 

तुषार दोशी यांच्या बदलीमागे राजकीय दबाव असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची सांगलीला बदली करण्यात आली असली, तरी आता नव्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या जागी पुणे क्राईम ब्रांचचे उपायुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.