'पाकिस्तानमधील ८० टक्के लोक समलैंगिक (गे) आणि २० टक्के लोक उभयलिंगी (बायसेक्शुअल) आहेत', असा खळबळजनक दावा पाकिस्तानमधील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच यांनी केला आहे. बलोच यांनी नुकतेच एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील LGBTQ+ समुदायाशी निगडीत विविध समस्यांवर भाष्य केले.
ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच
हिना बलोच 'ख्वाजा सिरा' समुदायाशी निगडीत आहे. या समुदायाला पाकिस्तानमध्ये कायदेशीररित्या मान्यताप्राप्त तृतीयपंथी प्रवर्ग म्हणून ओळखले जाते. त्या 'सिंध मूरत मार्च'च्या सह-संस्थापिका देखील आहेत. बलोच यांनी 'क्विअर ग्लोबल' या यूट्यूब चॅनलवरील ३७ मिनिटांच्या संभाषणादरम्यान विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. पाकिस्तानमध्ये समलैंगिक नागरिकांची संख्या अधिक आहे, परंतु ती सामाजिक दबाव, धार्मिक रूढी आणि सांस्कृतिक दडपणामुळे ही माहिती कधीच उघड केली जात नाही, असा खळबळजनक खुलासा बलोच यांनी या पॉडकास्टमध्ये केला आहे.
काय म्हणाल्या हिना बलोच?
'मला वाटतं पाकिस्तानमधील ८० टक्के लोक समलैंगिक आहेत आणि उरलेले २० टक्के उभयलिंगी आहेत. मला नाही वाटत की पाकिस्तानमध्ये कोणीही विषमलिंगी आहे. लोक फक्त याबाबत उघडपणे बोलत नाहीत, ते समाजात स्वीकारलेही जाणार नाही. धर्म आणि कौटुंबिक प्रतिष्ठेचा आधार घेऊन लैंगिकतेच्या विषयाला सर्रासपणे बगल दिली जाते,' असे हिना बलोच म्हणाल्या. 'मला घरात लिपस्टिक लावताना, दागिने किंवा महिलांचे कपडे घालताना भीती वाटायची. घरातल्यांनी ओरडू नये, मारु नये याबाबत सतत मनात भीती होती', असेही बलोच यांनी अनुभव कथन केले.
लैंगिक अभिव्यक्ती
कराचीमध्ये लैंगिक अभिव्यक्तीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. घरातील हिंसाचार किंवा शिक्षेचा सामना करत स्वतःला स्त्री म्हणून कसे सादर केले? समाजात लिंग-विसंगती, पोशख, दागिने आणि दिसण्याबद्दलची भीती यांचा कशा पद्धतीने सामना केला याची माहिती बलोच यांनी या मुलाखतीत दिली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला
पाकिस्तानात तृतीयपंथीयांसाठी समाजासाठी भीक मागणे, शरीरविक्रय किंवा नाच-गाणे करणे एवढेच मार्ग शिल्लक होते. पण, त्यापलिकडे जाऊन वेगळी ओळख निर्माण केल्याचे बलोच सांगतात. पाकिस्तानमधील ८० टक्के लोक आपली लैंगिक ओळख लपवून जगतात, कारण सत्य स्वीकारणे तिथे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव हिना यांना पाकिस्तान सोडावे लागल्याचे बलोच यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.