राज्यात असलेल्या मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह वर्ग एक, दोन, तीन अशा प्रकारच्या सर्व कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याच्या एकूण उपलब्ध क्षमतेपेक्षा (उपलब्ध क्षमता २७१८४) तब्बल १४ हजार ४४६ जास्त कैदी बंदीवासात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कैद्यांनी ओव्हरफ्लो झालेल्या राज्यातील कारागृहांचा प्रवास कोंडवाड्यांकडे सुरू आहे की काय अशी शंका वर्तवली जात आहे.
राज्यात मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, विशेष कारागृह, किशोर सुधारालय, मुंबई जिल्हा महिला कारागृह, खुले कारागृह आणि खुली वसाहत असे एकूण ६० कारागृह आहेत. सन २०२६/२७ गृह विभाग कार्यक्रम अंदाजपत्रक भाग ५ (तुरुंग ) मधील उपलब्ध माहितीनुसार या सर्व कारागृहांत बंदी ठेवण्याची एकूण अधिकृत क्षमता २७,१८४ इतकी असताना ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत या सर्व कारागृहांमध्ये ४१,६३० कैदी ठेवण्यात आले होते. याचाच अर्थ कारागृहांच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा या कारागृहांमध्ये तब्बल १४ हजार ४४६ कैदी बंदीवासात अधिकचे ठेवण्यात आले होते. सर्व कारागृहात मिळून एकूण अधिकृत महिला बंदी ठेवण्याची क्षमता १ हजार ५५३ इतकी होती. मात्र प्रत्यक्षात या सर्व कारागृहात मिळून १ हजार ८८० महिला बंदी होत्या.
– कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन
राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह वर्ग एक ची १६ कारागृहे, जिल्हा कारागृह वर्ग दोन ची १८ कारागृहे, जिल्हा कारागृह तीनची १७ कारागृहे अशा एकूण ६० कारागृहांचा आढावा घेतला असता या सर्व कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बंदी ठेवण्यात आल्याचे दिसून येते. या सर्व कारागृहामध्ये मिळून २७१८४ इतकी चंदी क्षमता होती, परंतु ३१ मार्च २०२५ पर्यंत या सर्व कारागृहात ४१ हजार ६३० बंदी होते. याचाच अर्थ १४ हजार ४४६ बंदी हे अतिरिक्त कोबले गेले होते. एकूणच राज्यातील कारागृहांची स्थिती कोंडवाड्यासारखी झाली आहे. उपलब्ध क्षमतेपेक्षा कारागृहांमध्ये अधिकचे कैदी ठेवणे म्हणजेच कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लघन असल्याचे जाणकाराचे मत आहे. तर दुसरीकडे कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या वाढावी है राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याकडे अंगुली निर्देश करणारे आहे.
महाराष्ट्र कारागृहांची आकडेवारी
एकूण कारागृहे: ६०अधिकृत क्षमता: २७,१८४ कैदीसर्व कारागृहांतील एकूण कैदी (वास्तविक संख्या): ४१,६३०१. क्षमतेपेक्षा जास्त कैदी: या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कारागृहांची अधिकृत क्षमता २७,१८४ असली, तरी तिथे प्रत्यक्षात ४१,६३० कैदी आहेत. याचाच अर्थ कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा सुमारे ५३% जास्त कैदी राहत आहेत.२. नवीन कारागृहांची गरज: कैद्यांची वाढती संख्या आणि कारागृहांची अपुरी पडणारी जागा पाहता, राज्य सरकारने नवीन कारागृहे उभारण्याचे नियोजन केले आहे. ताज्या बातम्यांनुसार, राज्यात आणखी १४ नवीन कारागृहे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.३. येरवडा कारागृह: पुण्याचे येरवडा मध्यवर्ती कारागृह हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि दक्षिण आशियातील मोठ्या कारागृहांपैकी एक मानले जाते.४. सुरक्षा आणि सुधारणा: कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन पोलीस भरतीवर (उदा. कारागृह शिपाई भरती) भर दिला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.