धक्कादायक: शेकडो मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड; अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा दोन तरुणांवर आरोप
अमरावती: राज्यात एकीकडे नाशिकमधील आयटी कंपन्यांमधील लैंगिक शोषणाची प्रकरणे ताजी असतानाच, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक अत्यंत संतापजनक आणि भीतीदायक प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांनी तब्बल 180 हिंदू-मुस्लिम तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे 350 हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून परतवाडा परिसरात काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोन संशयित मुस्लिम तरुणांनी अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांना हॉटेल्समध्ये बोलावून त्यांचे गुपचूप चित्रीकरण करण्यात आले. या व्हिडिओच्या आधारे मुलींना ब्लॅकमेल करणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे आणि त्यांना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलण्याचे एक मोठे रॅकेट येथे सक्रिय असल्याचे समोर येत आहे.
180 मुलींचे 350 व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल करून पीडितांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याचे गंभीर आरोप आहेत. बदनामीच्या भीतीने पीडित कुटुंबे समोर येत नव्हते. इतका मोठा प्रकार घडूनही स्थानिक पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी थेट पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. “हा केवळ गुन्हा नसून एक ‘संघटित गुन्हेगारी’ आहे. भीतीपोटी मुली तक्रार करायला पुढे येत नसतील, तर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करायला हवी,” अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.