Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेत निष्ठावंतांना डच्चू; पराभूतांना 'लॉटरी' तर दिग्गजांची पोरं राजकारणात सक्रिय!

सांगली महापालिकेत निष्ठावंतांना डच्चू; पराभूतांना 'लॉटरी' तर दिग्गजांची पोरं राजकारणात सक्रिय!


सांगली: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीत आज राजकीय भूकंप पाहायला मिळाला. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या अधिकृत निवडी जाहीर करताना अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. पक्षासाठी घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांना बाजूला सारून, पराभूत उमेदवारांना आणि वरून आलेल्या नावांना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे 'धक्कातंत्र': विरोधकांनाही केले आपले!
​भाजपच्या यादीत सर्वाधिक खळबळ डॉ. पंकज म्हेत्रे यांच्या नावाने उडवून दिली आहे. जनसुराज्य पक्षाकडून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या म्हेत्रे यांना भाजपने थेट सभागृहात प्रवेश दिला आहे. यामुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते पांडुरंग कोरे यांचा पत्ता कट झाला असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

दुसरीकडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपला शब्द पाळत वृत्तपत्र विक्रेते दरिबा बंडगर यांना संधी दिली आहे, तर संघवर्तुळातून केदार खाडिलकर आणि निष्ठावंत विश्वजित पाटील यांनाही स्थान मिळाले आहे. मात्र, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांना 'पुढच्या वर्षी बघू' म्हणत वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
​काँग्रेसमध्ये 'विशाल-विश्वजित' पॅटर्न; बिरनाळे घराण्याचे पुनरागमन

​काँग्रेसमध्ये 'तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी' देण्याचे आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र आहे. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी अमित शहा आणि सागर बिरनाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, माजी आमदार आप्पासाहेब बिरनाळे यांचे नातू सागर यांच्या निवडीमुळे सांगलीच्या राजकारणात बिरनाळे कुटुंब  पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.

​राष्ट्रवादीत हायव्होल्टेज ड्रामा: तटकरेंची यादी बाजूला?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडीत सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळाला. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी बंद पाकीट दिल्यानंतर सदस्य करण जामदार यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठवलेल्या यादीत दिगंबर जाधव यांचे नाव असताना ते कापून दुसरीच नावे घुसवल्याचा आरोप जामदार यांनी केला.
​पराभूतांचा सन्मान: निवडणुकीत पराभूत होऊनही स्नेहल सावंत (राष्ट्रवादी) आणि डॉ. म्हेत्रे (भाजप) यांना 'स्वीकृत'चे वरदान मिळाले.

​निष्ठावंतांची कोंडी: पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते पुन्हा एकदा डावलले गेले आहेत.
​स्थानिक नेत्यांचे वर्चस्व: राष्ट्रवादीच्या निवडीत जयंत पाटील यांच्या प्रभावापेक्षा स्थानिक नेत्यांची 'फिल्डिंग' वरचढ ठरल्याची चर्चा आहे. ​या निवडीनंतर महापालिकेत नवीन राजकीय समीकरणे आकाराला येणार असून, डावलले गेलेले गट आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.