राज्याच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा 'खातेपालटा'च्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. महायुती सरकारमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने सांगलीतील राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटत आहेत.
अर्थ आणि महसूल खात्यावरून पेच
अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. आता हे अर्थ खाते भाजपकडेच राहावे, असा एक मोठा गट आग्रही आहे. दुसरीकडे, जर राष्ट्रवादीला अर्थ खात्यावर पाणी सोडावे लागले, तर ते महसूल खात्यासाठी आग्रह धरण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपचे वजनदार नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खाते सोडावे लागू शकते, ज्या बदल्यात त्यांना ऊर्जा खाते दिले जाण्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांचीही धाकधूक वाढली
केवळ भाजप आणि राष्ट्रवादीच नव्हे, तर शिवसेनेच्या कोट्यातील मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतात. संजय शिरसाट (सामाजिक न्याय) आणि शंभूराज देसाई (पर्यटन) यांच्याकडील जबाबदारी दुसऱ्यांकडे सोपवली जाण्याची चिन्हे आहेत.
विरोधकांचा 'मलाईदार' खात्यावरून टोला
या सर्व घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कडक शब्दात टीका केली आहे. "मलाईदार खाती कोणाला मिळावी यासाठीच महायुतीत ही रस्सीखेच सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.
सांगलीचे लक्ष कोणाकडे?
सांगली जिल्ह्याचे राजकीय वजन पाहता, मंत्रिमंडळातील या खांदेपालटाचा जिल्ह्याच्या विकासकामांवर आणि स्थानिक नेत्यांच्या ताकदीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस आणि शिंदे यांना सुनेत्रा पवार यांना साथ देत असतानाच खातेवाटपावरून निर्माण होणारी कटुता टाळण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
टिप :-"सांगलीकरांनो, तुमच्या मते अर्थ की महसूल, कोणतं खातं राज्यासाठी महत्त्वाचं?" आपलं मत नोंदवा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.