"Big Breaking : नसरापूर अत्याचार प्रकरणात दिल्लीची 'एन्ट्री'! थेट केंद्राकडून आदेशांचा धडाका; आता कोणाचीही खैर नाही!"
पुणे: पुण्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील नराधमास कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पुण्यात शनिवारी रात्री नागरिकांनी संतप्त रास्ता रोको केला.
यामुळे नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्याच्या परिणामी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्यातील या धक्कादायक प्रकरणाची दखल आता थेट दिल्लीतून घेण्यात आली आहे.
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने 'सु मोटो कॉग्निजन्स' (स्वत:हून दखल) घेतला असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक पाऊले उचलली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून आता केंद्र स्तरावरून यावर देखरेख ठेवली जाणार आहे.
तपासावर केंद्राची नजर
राष्ट्रीय महिला आयोगाने 'नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स' यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यास अशा संवेदनशील प्रकरणांत तपासावर विशेष देखरेख ठेवणे आणि दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आयोगाकडून पोलीस प्रशासनाशीही संपर्क साधला जात आहे.
पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई
केवळ कारवाईच नाही, तर पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठीही आयोगाने पुढाकार घेतला आहे. पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळावी यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत, असे आयोगाने म्हटले आहे. घटनेमुळे कुटुंबावर ओढवलेला मानसिक आणि सामाजिक आघात पाहता, त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळावे ही आयोगाची प्राथमिकता आहे.
फास्ट ट्रॅक कोर्ट आणि वेळेत आरोपपत्र
गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसावा यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पहिले म्हणजे, पोलिसांनी या प्रकरणात वेळेत आणि ठोस आरोपपत्र दाखल करावे. दुसरे म्हणजे, हा खटला 'फास्ट ट्रॅक' न्यायालयात चालवून निकाल लवकरात लवकर लागावा, जेणेकरून पीडितेला विनाविलंब न्याय मिळेल. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आयोगाची ही सक्रियता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.