BIG BREAKING! ३० दिवस तुरुंगात घालवले तर थेट पद धोक्यात! पंतप्रधान आणि मंत्र्यांसाठी येतोय कडक कायदा? उज्ज्वल निकमांचे मोठे विधान
देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेट मंत्र्यांसाठी कठोर नियम लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गंभीर प्रकरणांमध्ये एखादा मंत्री किंवा उच्चपदस्थ नेता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास त्याला पदावरून दूर करण्याबाबत नवा कायदा आणण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात माहिती देताना, "हा कायदा देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत मोठे आणि क्रांतिकारक पाऊल ठरू शकतो," असे सांगितले आहे.
केंद्र सरकारच्या या प्रस्तावित कायद्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत याबाबत चर्चा सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये कायदा सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र हा कायदा नेमका कधी लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या संभाव्य निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून देशभराचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.