Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींचा नवा मास्टर प्लॅन! महाराष्ट्रातील 'हे' २ खासदार होणार मंत्री?

मोदींचा नवा मास्टर प्लॅन! महाराष्ट्रातील 'हे' २ खासदार होणार मंत्री?


केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. हा विस्तार 21 मे रोजी होईल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे 21 मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बोलावण्यात आली असून या बैठकीमध्ये सदर विस्तारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता अधिक आहे.

21 तारखेला काय होणार?

मोदींनी 21 मे रोजी बोलावलेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची केवळ शक्यता असली तरी या बैठकीमध्ये सरकारी योजनांची अंमलबजावणी, मंत्रालयांचा कामकाज आणि मध्यपूर्व युद्धामुळे निर्माण झालेलं ऊर्जाविषयक संकट यासारख्या विषयांवर चर्चा होणार होणार आहे. ही बैठक पूर्वी 7 मे रोजी होणार होती मात्र ती पुढे ढकलून आता 21 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.

कधी होणार विस्तार?
सध्या तरी मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात किंवा फेरबदलासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र मे महिन्यातील बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर जून महिन्याचा दुसरा आठवडा किंवा जून अथवा ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरफार होण्याची किंवा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा विस्तार म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या सरकारसाठी नवा रीसेट मानला जातोय. जून महिन्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
आगामी निवडणुकांची तयारी

मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. हा फेरफार म्हणजे 2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारीचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रातून या खासदाराचं मंत्रिपद निश्चित?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून नवीन चेहऱ्यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 2 मंत्रीपदं मिळू शकतात. त्यातही शिंदेंच्या पक्षातील एका खासदाराचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. पुण्यातील मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणेंना केंद्रीय राज्यमंत्रीपदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय अन्य एका खासदाराचीही मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
सध्या महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कोण?

सध्या महाराष्ट्रामधून नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले यासारखे खासदार केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्रातून नेमकी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.