Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! बारामतीत काळजाचा थरकाप! ज्या ठिकाणी अजितदादांचा अपघात झाला, तिथेच पुन्हा कोसळलं विमान; नियतीचा भयानक योगायोग!

Big Breaking! बारामतीत काळजाचा थरकाप! ज्या ठिकाणी अजितदादांचा अपघात झाला, तिथेच पुन्हा कोसळलं विमान; नियतीचा भयानक योगायोग!


बारामती: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. अजितदादांसह अन्य ५ जणांचा आपले प्राण गमवावे लागले. अजितदादांचा विमान अपघात झालेल्या गावातच आणखी एक विमान कोसळल्याची घटना झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीमधील 'रेड बर्ड' (Red Bird) या नामांकित कंपनीचे पायलट ट्रेनिंग विमान आज सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी आकाशात झेपावले होते. सकाळी ८:४० वाजण्याच्या सुमारास विमान गोजूबावी गावाच्या उत्तर दिशेला सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला. हवेतच विमानाचा इंजिनचा आवाज बंद पडल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती.
उसाच्या शेतात सुरक्षित लँडिंग

विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाही, शिकाऊ वैमानिकाने कमालीचे प्रसंगावधान राखले. विमानाचा वेग आणि जमिनीचे अंतर लक्षात घेत त्याने विमानाची दिशा लोकवस्तीकडून शेताकडे वळवली. जवळच असलेल्या एका उसाच्या शेतात वैमानिकाने विमानाचे सुरक्षितरीत्या 'इमर्जन्सी लँडिंग' केले. जमिनीला आदळताना विमानाचे नुकसान झाले असले, तरी वैमानिकाला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.

नागरिकांची घटनास्थळी धाव
विमानाचा अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रशिक्षण घेणारा वैमानिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याला धीर दिला आणि तातडीने कंपनीच्या प्रशासनाला व पोलिसांना याची माहिती दिली.

बारामतीत वारंवार होणाऱ्या प्रशिक्षण विमानांच्या अपघातांमुळे आता सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) या घटनेची चौकशी करण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.