"राज्याच्या पोलीस प्रशासनात मोठी खळबळ! २१ वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या एकाच वेळी बदल्या; पाहा संपूर्ण यादी"
मुंबई :- महाराष्ट्राच्या पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. राज्यातील 21 IPS वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा अर्थात आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांना आता नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात सह नाशिक धर्मांतर प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ माजली आहे. अशातच नाशिकमधील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी डॉ. डी एस स्वामी यांची नियुक्ती झाली आहे. सुरज गुंजाळ यांची मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक असलेले बाळासाहेब पाटील यांची अचानक बदली झाली असून त्यांच्या सह मालेगाव येथील तेगबीर सिंह संधू यांची देखील बदली करण्यात आली आहे.
नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. डी एस स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नाशिकचे विद्यमान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर या ठिकाणी बदली झाली आहे. त्याचबरोबर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी सुरज गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची पोलीस अधीक्षक जालना पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आदेश सुग्रीव धपाटे शासनाचे सहसचिव यांच्या सही द्वारे पारित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस आस्थापना मंडळ एकच्या शिफारशीनुसार राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात, पुणे, मुंबई, नाशिकसह अनेक जिल्ह्यातील पोलिस
बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी
अजय के. बन्सल - पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्यसिंगुरी विशाल आनंद - पोलीस अधीक्षक, धुळेबाळासाहेब पाटील - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहरसोमनाथ घार्गे - सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालयरविंद्रसिंह एस. परदेशी - उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबईसंदीप घुगे - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहरश्रवण दत्त - स्टाफ ऑफिसर, अपर पोलीस महासंचालक - विशेष कृतीमुम्मका सुदर्शन - पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरधोंडोपंत एस. स्वामी - पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणअनुज मिलिंद तारे - पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणेअनुराग जैन - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहरअश्विनी सानप - पोलीस अधीक्षक, नंदुरबारतेगबीर सिंह संधु - पोलीस अधीक्षक, जालनाराजकुमार शिंदे - पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणेनिकेश खाटमोडे - पोलीस अधीक्षक, वाशिमआयुष नोपानी - पोलीस अधीक्षक, चंद्रपूरपंकज कुमावत - पोलीस अधीक्षक, परभणीनिकेतन कदम - पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीणसूरज गुंजाळ - अपर पोलीस अधीक्षक, मालेगावगजानन राजमाने - पोलीस उप आयुक्त, मुंबई शहरदत्ता लक्ष्मण तोटेवाड - अपर पोलीस अधीक्षक, अमरावती
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.