सांगली शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कंबर कसण्याऐवजी, सध्या सांगली शहर आणि परिसरात एका विशिष्ट 'पॅटर्न'ची चर्चा रंगली आहे. "अभी नही तो कभी नही!" असे जणू ब्रीदवाक्य घेऊन फिरणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. दररोज होणारी ५ ते १० हजारांची अवैध वसुली (तोड) आता चर्चेचा विषय ठरत असून, या प्रकाराला स्थानिक नागरिकांनी 'लाकूडतोड्या'ची उपमा दिली आहे.
जंगल नाही, खिसा कापला जातोय!
ज्याप्रमाणे एखादा लाकूडतोड्या जंगलात शिरून झाडावर कुऱ्हाड चालवतो आणि जंगलं फस्त करतो, तसाच प्रकार सांगलीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. फरक इतकाच की, जंगलातला लाकूडतोड्या झाडं कापतो, पण येथील 'अभी' नावाचा अदृश्य नियम रोज वाहनं अडवून लोकांचे खिसे कापतो आहे.नियम कडक की खिसा गरम?: नियमांचे उल्लंघन झाले असल्यास पावती फाडण्याऐवजी 'तडजोड' करण्यावर भर दिला जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.रोजचे टार्गेट: सूत्रांच्या माहितीनुसार, दररोज ५ ते १० हजार रुपयांपर्यंतचा 'तोड' एका विशिष्ट भागात केला जात आहे.नागरिकांमध्ये संताप: "रस्त्यावर उतरलं की दंड भरण्यापेक्षा 'सेटलमेंट'साठीच जास्त दबाव टाकला जातो," असे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले आहे.वाहतूक विभागाने या 'अभी' पॅटर्नकडे दुर्लक्ष केल्यास, शहरातील रस्ते शिस्तबद्ध होण्याऐवजी सामान्य माणसाचा खिसा मात्र पूर्णपणे 'साफ' झाल्याशिवाय राहणार नाही. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.