मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात चक्क बुलेटवरून एंट्री केल्याने सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण हा मार्ग निवडल्याचं त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर नमूद केलं आहे.
सोबत आपल्या बाईक वारीचे फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत. मोदींचं काटकसरीचं आवाहन व देवेंद्र फडणवीसांची बुलेट वारी चर्चेत आली असतानाच आता ही बुलेटसवारी नियमाच्या कचाट्यात सापडते की काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, पब्लीसिटी स्टंटच्या नादात मुख्यमंत्री महोदयांनी बुलेट सफर केली खरी, पण या बुलेटचे PUC एक्सपायर झालेले आहे. आता सामान्य माणसांना रस्त्यावर पकडून पकडून दंड ठोकणारे पोलीस मुख्यमंत्र्यांची पावती फाडणार का ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला असून सोबत बुलेटची नंबर प्लेट व PUC एक्सपायर झाल्याची पावतीचे फोटो शेअर केले आहेत. यावर फडणवीसांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे आहे.
..तर "Expired Maal" चालतं का? वर्षा गायकवाड
दरम्यान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका करताना, एक्सायरर्ड माल देशानं रिजेक्टेड केलेला माल अशा शब्दात टीका केली होती. आता, वर्षा गायकवाड यांनीही तोच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. विधानभवनात येण्यासाठी वापरलेल्या बुलेटची पीयुसी एक्स्पायर झाली होती, त्याच अनुषंगाने, तर "Expired Maal" चालतं का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या साधनेसाठी, स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे PUC मुदतबाह्य झालेलं होतं, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रेही शेअर केली आहेत.आज विधानपरिषदेतील 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. वर्षा निवासस्थान ते विधानभवनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बुलेट राइड केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफाही दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाला. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि अधिकाऱ्यांनी वाहनाचा ताफा कमी केला आहे.अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट बुलेट चालवत विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या या साध्या आणि हटके प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत: बुलेट चालवली तर त्यांच्या मागच्या सीटवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार बसले होते. यावेळी दोघांनीही हेल्मेट परिधान केले होते व वाहतुकीचे सर्व नियम पाळून त्यांनी आपली बाईकस्वारी केली. मात्र पीयूसीवरून आता अडचणीत सापडले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.