केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवली आहे. आयुष्मान भारत योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळेच या योजनेमुळेच ज्येष्ठ नागरिकांना मदत होते. यामध्ये लाखो रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
आयुष्मान भारत योजनेत ७० पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. आता ही प्रोसेस खूप सरळ आणि सोपी झाली आहे. तुम्हाला यासाठी सतत कार्यालयात जाण्याची गरज भासणार आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठी आयुष्मान (गोल्डन कार्ड)मिळते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरश्रा मिळते. दरम्यान, आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अवघ्या काही मिनिटांत आयुष्मान कार्ड बनवू शकतात.
आयुष्मान कार्ड कसं बनवायचं?
लाभार्थ्यांना सर्वात आधी beneficiary.nha.gov.in पोर्टलवर जायचे आहे. यानंतर ईकेवायसी पूर्ण करायची आहे.सर्वात आधी तुम्हाला आयुष्मान अॅपवर जायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा.लॉग इन केल्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि स्वतः ची माहिती भरायची आहे.यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर क्लिक करायचे आहे. यानंतर केवायसी करा.यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्यातून लाईव्ह फोटो काढून अपलोड करा.यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म द्यायचा आहे. त्यानंतर डिजिटल आयुष्मान कार्ड डाउनलोड करुन प्रिंट काढू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.