काळजाचा ठोका चुकवणारी ती रात्र: हातात इंजेक्शन घेऊन मुलगा घरात शिरला, पण अवघ्या काही सेकंदांपूर्वीच अमजद खान यांनी जगाचा निरोप घेतला होता!
शोलेमधील गब्बर या व्यक्ट्रिकेहेमुळे अभिनेते अमजद खान यांना रातोरात यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यांच्या अभिनयामुळे अनेक मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांना तगडा स्पर्धक लाभला. त्यांच्या सकारात्मक भूमिकाही तितक्याच गाजल्या. यशस्वी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये वाटचाल सुरु असतानाच एका भीषण अपघातामुळे अमजद खान यांचं आयुष्य बदललं आणि पुढे त्या उपचारांदरम्यान निधन झालं.
शोले सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच अमिताभ आणि अमजद खान यांच्या चांगली मैत्री निर्माण झाली. त्या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. अमजद यांचा अपघात झाल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या कुटूंबाला खूप मदत केली. अमजद खान यांचा त्यांच्या मृत्यूपूर्वी 1976 मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातातून ते बचावले पण त्यांना गंभीर दुखापत झाली होती. नुकतीच अमजद खान यांच्या मुलाने विकी ललवाणी यांना मुलाखत दिली. यावेळी त्याने अमजद खान यांच्या अखेरच्या काळाबद्दल अनेक खुलासे केले.
शदाब खान यांनी सांगितलं की, अमिताभ आणि माझे वडील पहिल्यापासून चांगले मित्र होते. त्या अपघातानंतर त्यांची मैत्री अधिक गहिरी झाली. तो अपघात गोव्यात झाला. द ग्रेट गॅम्बलर या सिनेमाच्या शूटसाठी बाबा तिथे गेले होते. मी आणि माझी आईसुद्धा त्यांच्याबरोबर होतो. त्या अपघातात सगळ्यांनाच गंभीर दुखापत झाली पण माझे बाबा मृत्यूच्या दारात उभे होते. आईही गंभीर जखमी झाली होते आणि माझं कॉलरबोन मोडलं होतं."
"ते गोव्याच्या दिशेने गाडी चालवत होते. गाडीत बाबा आणि चालक असे दोघंच होते. गाडी बाबा चालवत होते. ती पहाटेची वेळ होती. पाऊस पडल्यामुळे रस्ता ओला झाला होता. अचानक मोठं वळण आलं. त्या काळी आणि आजही लोक असं करतात की एखादा ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या मध्येच थांबला असेल तर त्याची खूण म्हणून लोक त्याभोवती दगड रचुन ठेवतात. त्या ट्रकला चुकवण्यासाठी बाबांनी गाडीचे स्टिअरिंग जोरात वळवले. रस्ता ओला असल्यामुळे गाडीचा ताबा सुटला आणि ती एका झाडावर जाऊन आदळली. आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं."
"या घटनेची माहिती बिग बींना मिळताच त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची सूत्र हातात घेतली. सगळ्याच उत्तम व्यवस्थापन केलं." "माझ्या वडिलांची अनेक हाडं मोडली होती., फुफ्फुसं फुटली, घशाला गंभीर दुखापत झालेली. ते जवळपास वर्षभर अंथरुणाला खिळून होते. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना दोन दशकं व्यायाम करता आला नाही. त्यांच्या पायात सळी बसवलेली असल्यामुळे त्यांना वीस वर्षं व्यायाम करता आला नाही. त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम पूर्णपणे थांबला आणि त्यांचं वजन वाढलं."
अमजद यांच्या निधनावेळेचा प्रसंग सांगताना शादाब म्हणाला की,"जेव्हा मी घरी परतलो तेव्हा आईने मला जरा बाबांना बघायला सांगितलं कारण ते झोपेतून उठत नव्हते. मी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा त्यांचं शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. डॉक्टरांनी आम्हाला एक विशिष्ट इंजेक्शन आणायला सांगितलं आणि ते आणण्यासाठी मी वेड्यासारखा गाडी चालवत गेलो. पण जेव्हा इंजेक्शन घेऊन घरी आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की मला इंजेक्शन आणण्यासाठी काहीच सेकंदांचा उशीर झाला आहे. बाबांचे प्राण गेले होते. मला खूप राग आला. संतापाच्या भरात मी घरातील भांडीकुंडी फोडली, भिंतीवर बुक्के मारले आणि वडिलांच्या मित्रालाही ढकलून दिलं." 27 जुलै 1992 ला अमजद खान यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय 47 होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.