नीट यूजी 2026 पेपर फूटी प्रकरणात आता सीबीआयला आणखी यश मिळाले आहे. सीबीआयने आता या प्रकरणात बायोलॉजीच्या प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे यांच्या अटकेनंतर आता ही दुसरी मोठी कारवाई म्हटली जात आहे. सीबीआयच्या सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे. या प्रकरणात आता अटक झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. नीट पेपर फूट प्रकरणाचे धागेदोरे आता प्रोफेसर आणि कोचिंग सेंटरशी जोडले जात असल्याचे उघड झाले आहे.
कुंपणानेच शेत खाल्ले
या प्रकरणात अटक केल्या मनिषा वाघमारे यांच्या चौकशीतून मनिषा मांढरे यांचे नाव समोर आले. मनिषा वाघमारे यांना सीबीआयने १४ मे रोजी अटक केली होती. जेव्हा तपासाची व्याप्ती वाढली तसे मनिषा मांढरे याचे नाव समोर आली. दोघींचा या प्रकरणात मोठा रोल आहे. सीबीआय आता मनिषा अंधारे यांच्या बँक खात्यांची आणि फोन कॉल्सचे डिटेल्स शोधून काढत आहेत. मनिषा गुरुनाथ मांढरे या महाराष्ट्रातील पुण्याच्या रहिवासी आहेत.त्या सिनियर बॉटनी प्राध्यापक आहेत. त्यांनी एनटीएच्या वतीने नीट-यूजी 2026परीक्षा प्रक्रियेत एक एक्सपर्ट म्हणून अधिकृतपणे सामील होत्या. एनटीए एक्सपर्ट पॅनलमध्ये असल्याने त्यांनी बॉटनी आणि झुलॉजीच्या प्रश्न पत्रिका सहज मिळाल्या. सीबीआयने या संपूर्ण रॅकेटचे कथित मास्टरमाईंट पी.व्ही.कुलकर्णी यांना लातूर येथून अटक केली. कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत. ते अनेक वर्षे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. त्यामुळे त्यांना प्रश्न पत्रिका सहज मिळणे शक्य होते. कुलकर्णी यांनी या ओळखीचा गैरवापर केला आणि संपूर्ण पेपर लीक केला.
पुण्यातील ट्युशन क्लासमध्ये रॅकेट
कुलकर्णी याने महाराष्ट्रातील पुणे येथील आपल्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोचिंग क्लास सुरु केले होते. या क्लासच्या विद्यार्थ्यांना त्यांनी संभाव्य प्रश्न, त्याचे पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितली होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोटबुकमध्ये ती लिहीली होती. विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्नच आणि उत्तरे ३ मे रोजी आयोजित परीक्षेत तसेच्या तसे आले.
लातूर येथे पालकांची तक्रार
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला तेव्हा लातूर येथील काही पालकांनी तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की एका कोचिंग संस्थेच्या मॉक टेस्टमध्ये विचारलेल्या ४२ प्रश्न नीटपरीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत आले होते. यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.