Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तामिळनाडूत राजकीय भूकंप! १०७ आमदारांचा सामूहिक राजीनामा? थलापती विजयची एन्ट्री अन् स्टालिन-पळणीस्वामींचे धाबे दणाणले!

तामिळनाडूत राजकीय भूकंप! १०७ आमदारांचा सामूहिक राजीनामा? थलापती विजयची एन्ट्री अन् स्टालिन-पळणीस्वामींचे धाबे दणाणले!


चेन्नई: तमिळनाडूमधील सत्तास्थापनेचा पेच आणखी तीव्र झाला असून विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) ने गुरुवारी मोठा इशारा दिला आहे. DMK आणि AIADMK यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास TVK चे सर्व 107 आमदार राजीनामे देतील, अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
DMK आणि AIADMK नेत्यांमध्ये दोन बैठका झाल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे. या बैठकीनंतर TVK ला संशय आहे की राज्यात सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी DMK आणि AIADMK एकत्र येत आहेत. 
विजय यांच्या TVK ने निवडणुकीत 108 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी दोन जागांवर विजय स्वतः विजयी झाले असल्याने पक्षाकडे सध्या 107 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे सरकार स्थापनेसाठी प्रथम संधी TVK ला मिळायला हवी, असा पक्षाचा दावा आहे.

राज्यपालांची अट
मात्र राज्यपाल आर. व्ही. अर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेचा दावा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला. आवश्यक संख्याबळ नसल्याचे कारण देत राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळली. सलग दोन दिवस झालेल्या बैठकीनंतरही विजय यांची बहुमतापर्यंत पोहोचण्याची योजना राज्यपालांनी मान्य केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याची अधिकृत पत्रे सादर करण्याची अट घातली आहे.

TVK ला सहा महिने त्रास देणार नाही

दरम्यान तमिळनाडूचे निवर्तमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना मोठे विधान केले आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK ला सरकार स्थापन करण्यासाठी DMK तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सहा महिने कोणताही त्रास न देता आम्ही फक्त पाहत राहू, असेही स्टालिन यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे DMK आणि AIADMK युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लागल्याचे मानले जात आहे.
राज्यात घटनात्मक संकट निर्माण होऊ नये किंवा पुन्हा निवडणुका लागू नयेत, अशी DMK ची भूमिका असल्याचे संकेत स्टालिन यांनी दिले. त्यांनी असेही म्हटले की, नवीन सरकारने DMK सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवाव्यात आणि TVK ने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनेही पूर्ण करावीत.

नवीन सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठीची मोफत नाश्ता योजना सुरू ठेवली पाहिजे, असे स्टालिन यांनी सांगितले. त्याचबरोबर 'कलैग्नर मगलिर उरिमै थोगई' अर्थात महिलांना दरमहा दिला जाणारा 1000 रुपयांचा भत्ता देखील सुरू ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याच्या विजय यांच्या आश्वासनाबाबत बोलताना स्टालिन म्हणाले की, हे आश्वासन टिकवणे कठीण आहे. आम्ही दिल्याप्रमाणे किमान 1000 रुपये तरी द्या. DMK अध्यक्ष स्टालिन यांनी दावा केला की त्यांच्या सरकारने 2021 च्या जाहीरनाम्यातील 90 टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत. मात्र NEET परीक्षा रद्द करण्यासारखी काही आश्वासने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याने पूर्ण करता आली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.