Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; पिस्तूलसह सराईत गुन्हेगार जेरबंद

सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; पिस्तूलसह सराईत गुन्हेगार जेरबंद


​सांगली: जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून ६० हजार ५०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील यांना गुप्त माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत करांडे हा कमरेला पिस्तूल लावून नागठाणे-वाळवा रोडवरील चोपण रस्ता परिसरात थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पदरीत्या थांबलेल्या अनिकेतला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले.

​अटक आरोपी: अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. चिठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ).
​फरार संशयित: अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत).
​जप्त मुद्देमाल: ₹६०,००० किमतीचे पिस्तूल आणि ₹५०० चे काडतूस.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हे पिस्तूल जत येथील अक्षय पाटील याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. ​या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी अक्षय पाटील याचा शोध पोलीस घेत आहेत. ​सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध एलसीबीची मोठी कारवाई! नागठाणे (ता. पलूस) परिसरात सापळा रचून अनिकेत करांडे याला अटक करण्यात आली आहे.
​ जप्त मुद्देमाल:

1 देशी बनावटीचे पिस्तूल
1 जिवंत काडतूस
​पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही कामगिरी फत्ते केली आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलीस सज्ज!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.