सांगलीचा कायापालट करणार: कोट्यवधींच्या रस्ते विकास कामांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन!
प्रभाग क्र. ८ आणि ११ मधील रस्ते काँक्रिटीकरण कामांचा भव्य शुभारंभ; नागरिकांकडून समाधान व्यक्त
सांगली: महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच अंतर्गत आमदार गाडगीळ यांच्या हस्ते मनपा क्षेत्रातील विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास कामांचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये प्रभाग क्रमांक ०८ मधील स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध रस्ते विकास कामांचे भूमीपूजन, तसेच ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने’अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील चैतन्यनगर औद्योगिक वसाहतीसमोरील काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, "सांगली शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास करणे हे आमचे ध्येय आहे. नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते, पाणी, गटारी आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विकासकामांसाठी निधीची कमतरता कधीही पडू दिली जाणार नाही. या सर्व कामांमुळे सांगली शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होत आहे."
उद्घाटन व लोकार्पण झालेली
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते आज खालील महत्वपूर्ण कामांचा शुभारंभ करण्यात आला:१. प्रभाग क्र. ०८ (कुपवाड ढवळेश्वर प्लॉट): अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम — रु. ७.३१ लाख२. प्रभाग क्र. ०८ (विनायक नगर गल्ली क्र. ०१): अंतर्गत रस्ता विकास काम — रु. १६.८७ लाख३. प्रभाग क्र. ०८ (विजयनगर पश्चिम शिव मंदिर परिसर): दक्षिण बाजूचा रस्ता विकास काम — रु. २४.८२ लाख४. प्रभाग क्र. ११ ड (चैतन्यनगर औद्योगिक वसाहतीसमोर): काँक्रिट रस्ता विकास काम — रु. ४१.९३ लाखया नवीन आणि दर्जेदार रस्ते विकास कामांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचा दळणवळणाचा प्रवास अधिक सुकर व सुरक्षित होणार आहे. वर्षानुवर्षांचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे विशेष आभार मानत समाधान व्यक्त केले.यावेळी मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, नगरसेविका योगिताताई राठोड, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, मिनाक्षीताई पाटील, नगरसेवक दीपक वायदंडे, माजी महापौर कांचनताई कांबळे, माजी नगरसेवक मनोज सरगर, राजेंद्र कुंभार, महेश निर्मळे, सुनील भोसले, सदाशिव पाटील, अजित दुधाळ, आकाश वळकुंडे, प्रसाद वळकुंडे, संजय कांबळे, महेश साळुंखे, संतोष रुपनर, रवींद्र माळी, दीपक शिंदे, अंकुश खरात, रमेश बद्रे, बापू डोंबाळे, समीर मुल्ला, ऋषिकेश वायदंडे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.