Breaking News! "उगाच प्रसिद्धीसाठी काही करत नाही, प्रश्न विचारणं माझी जबाबदारी"; व्हिडिओ व्हायरल करण्याच्या आरोपांवर नॉर्वेच्या पत्रकार हेले लेंग यांचं सडेतोड उत्तर!
पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉर्वेमध्ये एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर असून युरोपातील विविध देशांना भेटी देत आहेत. नॉर्वेतील भेटीदरम्यान नॉर्वेचे पंतप्रधान जोनस स्टोर यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या पत्रकार हेले लेंग स्वेन्सेन यांनी भारतीय प्रेस स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर तिचं फेसबुक अकाऊंट २४ तासांसाठी बंद करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न व्हायरल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठरवून विचारला होतास का? याबाबत पत्रकार हेले लेंग स्वेन्सेनने उत्तर दिलं आहे.
हेले लेंग यांनी काय उत्तर दिलं?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेला प्रश्न हा व्हायरल होण्यासाठी विचारला होता का? असं विचारलं असता पत्रकार हेले लेंगने सांगितलं की मी पेशाने पत्रकार आहे. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मी माझं काम करत होते. बाकी काहीच नाही. प्रश्न उपस्थित करणं ही माझी जबाबदारी आहे, मी त्याच उद्देशातून हे केलं होतं. मला हे मान्य आहे की मी तो मुद्दा नॉर्वेच्या पराराष्ट्र मंत्रालयासमोर ठेवला नव्हता, मला तिथे तो प्रश्न सुचला आणि मी तो विचारला असं त्यांनी सांगितलं. हेले लेंग यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे उत्तर दिलं आहे. तसंच लेंग यांना विचारण्यात आलं की तुम्हाला हे ठाऊक होतं का की ती एक मुक्त पत्रकार परिषद नव्हती. त्यावर लेंग यांनी सांगितलं की मला हे माहीत होतं की मला भविष्यात मोदींना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे मी त्या क्षणी प्रश्न विचारला.पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार हेले लेंग यांना ट्रोलिंगचा सामना का करावा लागत आहे? मोदींना प्रश्न विचारण्याच्या वेळेस काय घडलं होतं? सर्वात आधी हेल लेंग यांना त्यांची पूर्ण ओळख देण्यास सांगण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या, “थोडक्यात सांगायचं तर मी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून पत्रकार म्हणून काम करते आहे. मी नॉर्वेतील राष्ट्रीय वृत्तपत्रांबरोबर काम केलं आहे. माझ्या गेल्या वृत्तपत्रासाठी काम करताना मला अमेरिकेतील निवडणुकीचं वृत्तांकन करण्यासाठी देखील पाठवण्यात आलं होतं.” “आता मी पुन्हा नॉर्वेत आले आहे. इथे मी राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांचं वृत्तांकन करते. मात्र आता मी एका कॉमेंटेटरच्या भूमिकेत आहे.”
उत्तर टाळलं गेल्याच्या मुद्द्यावर हेल लेंग यांनी काय म्हटलंय?
ती एक संयुक्त पत्रकार परिषद होती याची मला कल्पना होती. मी तरीही मोदींना प्रश्न विचारला. मला वाटलं होतं की इतक्या मोठ्याला प्रश्न विचारण्याची संधी मिळते आहे तर ती आपण सोडायला नको. त्यामुळे मी प्रश्न विचारला पण त्यांच्याकडून उत्तर येणार नाही हे मला ठाऊक होतं. मात्र मी व्हायरल होण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो प्रश्न विचारला नव्हता.
नॉर्वेत प्रसारमाध्यमांना किती स्वातंत्र्य आहे?
नॉर्वेमध्ये काम करत असताना तुम्ही परदेशातून आलेल्या राष्ट्रप्रमुखाला प्रश्न विचारता प्रेस फ्रिडम इंडेक्स किती महत्त्वाचा आहे असं विचारलं असता हेलने सांगितलं की नॉर्वेत आमच्या समाजाच्या कार्यपद्धतीवर आम्हाला अभिमान आहे. भारताच्या तुलनेत नॉर्वेची लोकसंख्या खूपच कमी आहे. अशा नॉर्वेत आमचे पंतप्रधान येतात तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलतात. आमची प्रसारमाध्यमं मुक्त आणि निःपक्षपाती आहेत. आम्ही तेच प्रश्न विचारतो जे आम्हाला विचारायचे असतात. उगाचच प्रसिद्धीसाठी काही करत नाही असंही हेल लेंग यांनी सांगितलं. नॉर्वेमध्ये जर आम्हाला उत्तर आवडलं नाही, तर आम्ही पुन्हा प्रश्न विचारू शकतो, या गोष्टीची मला सवय आहे. किमान असं वाटलं पाहिजे की माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं. मी प्रश्न विचारणं आणि मग मी जे विचारत होते त्यावर राजकारण्यांनी उत्तर देणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यपणे अशी उत्तरं जास्त रंजक असतात. इतरांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे असंही हेल लेंग यांनी म्हटलं आहे.
मोदींच्या व्यंगचित्राबाबत काय म्हणाल्या हेले लेंग?
नॉर्वेच्या वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गारुड्याच्या रुपात दाखवत व्यंगचित्र छापण्यात आलं. याबाबत प्रश्न विचारला असता लेंग यांनी मौन बाळगलं आहे. मी तो लेख वाचलेला नाही. त्यामुळे असं व्यंगचित्र का वापरण्यात आलं हे मला सांगता येणार नाही. त्या व्यंगचित्रामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यावर चर्चा झाली पाहिजे असं लेंग यांनी सांगितलं. भारताच्या लोकाशाहीबाबत तुम्हाला काय ठाऊक आहे हे विचारलं असता मी भारतात कधीही कव्हरेज केलेलं नाही किंवा रिपोर्टर म्हणून काम केलेलं नाही. मात्र भारतात प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये माहिती वाचली आहे. मला भारताच्या राजकारणापेक्षा तिथली संस्कृती तिथले खाद्यपदार्थ हे जास्त आवडतात असंही लेंग यांनी सांगितलं.
राहुल गांधींची मुलाखत घेण्याची इच्छा
या मुलाखतीत लेंग यांना विचारण्यात आलं की राहुल गांधींची मुलाखत घेण्याची माझी इच्छा आहे. मी त्यासाठी त्यांना संपर्क केला आहे. जर मला राहुल गांधींची मुलाखत घेण्याची संधी मिळाली तर मी त्यांची मुलाखत नक्की घेईन. त्याचप्रमाणे भारतातील मानवाधिकार आणि माध्यमांचं स्वातंत्र्य याबाबतच्या मुद्द्यांवरही त्यांना प्रश्न विचारेन.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.