Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बकरी ईद का साजरी केली जाते? प्राण्यांची कुर्बानी देण्यामागे काय आहे कारण?

बकरी ईद का साजरी केली जाते? प्राण्यांची कुर्बानी देण्यामागे काय आहे कारण?


ईद-उल-अजहा याला बकरीद किंवा बकरी ईद म्हटलं जातं. बकरी ईद हा मुस्लिमांमधील सर्वात खास सणांपैकी एक आहे. इस्लामी कॅलेंडरनुसार, ईद-उल-अजहा जुल हिज्जा महिन्यात साजरा केला जातो. जो इस्लामी वर्षाचा १२ वा महिना असतो. हा सण जगभरात अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी लोक बकरीदच्या तयारीला लागतात. अनेक ठिकाणी बकरी ईदला कुर्बानीची ईदही म्हटलं जातं.

बकरी ईद का साजरी केली जाते? 
बकरी ईद हा सण मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. संपूर्ण जगभरात हा सण अत्यंत श्रद्धा आणि उत्साहासह साजरा केला जातो. हा दिवस पैगंबर इब्राहिम यांच्या अल्लाहप्रती असलेल्या त्यागाचं आणि निष्ठेचं स्मरण करून देतो. पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आपल्या मुलाचा बळी देण्याचं मान्य केलं. इस्लामी मान्यतेनुसार, इब्राहिम यांना अल्लाहचा आदेश देणारं एक स्वप्न पडलं, ज्यात त्यांना आपल्या मुलाचा बळी देण्याची आज्ञा देण्यात आली होती. इस्लाममध्ये महिलांना मशीद प्रवेशास बंदी नसते; तरीही महिला का जात नाहीत? मोहम्मद पैगंबरांचे निर्देश काय होते?

त्यांनी अल्लाहच्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय घेतला. मात्र कुर्बानीपूर्वीच अल्लाहने त्यांच्या आस्थेचा स्वीकार केला आणि मुलाऐवजी एक प्राणी कुर्बानीसाठी पाठवला. तेव्हापासून मुस्लीम बांधव या दिवशी नमाज, कुर्बानी, दान करतात, याशिवाय आनंदाने कुटुंबासह हा सण साजरा करतात. आजही जगभरात मुस्लीम बकरी, मेंढी किंवा ऊंटाची कुर्बानी देतात. कुर्बानीचं मांस तीन भागात विभागलं जातं. एक कुटुंबासाठी, एक नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी तिसरा भाग गरीबांमध्ये वाटला जातो. जेणे करुन या सणात बंधुभाव, मदत आणि माणुसकीची भावना टिकून राहील. याशिवाय हा पर्व सौदी अरबमध्ये होणाऱ्या हज यात्रेदरम्यान साजरा केला जातो. भारतात या सणापूर्वी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. खास पदार्थ तयार केले जातात.

बकरीद कशी साजरी केली जाते?

बकरीदला मुस्लीम बांधव सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात आणि अल्लाहची इबादत करतात.

कुटुंबातील मोठे पुरुष स्वच्छ आणि पारंपरिक कपडे घालून मशिदीत जातात आणि नमाज अदा करतात.

नमाज पठण झाल्यानंतर प्राण्याची कुर्बानी दिली जाते आणि अल्लाहचे धन्यवाद मानले जातात.

यानंतर मुस्लीम बांधव आपले नातेवाईक आणि मित्रांची भेट घेतात. गरीब आणि गरजूंची मदत करतात.

(Disclaimer: : वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सांगली दर्पण याची पुष्टी करीत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.