सावधान! बोगस चेक देणे पडले महागात; नांद्रे येथील आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा:, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचा विजय.
कर्ज रक्कमेपोटी बोगस धनादेश देऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी अमोल रावसाहेब सकळे (रा. नांद्रे, ता. मिरज) याला न्यायालयाने सहा महिने साधी कैद आणि २ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली आहे. सांगली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. व्ही. व्ही. खुलपे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, आरोपीविरुद्ध जेल वॉरंट काढण्याचे आदेशही दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगलीच्या नांद्रे शाखेतून आरोपी अमोल सकळे याने कर्ज घेतले होते. संस्थेने कर्जवसुलीसाठी वारंवार तगादा लावला असता, आरोपीने थकीत कर्ज रक्कमेपोटी १,८१,०९९ रुपयांचा धनादेश (चेक) संस्थेला दिला होता. मात्र, संस्थेने हा चेक बँकेत जमा केला असता तो अपुऱ्या निधीअभावी न वटता परत (बाऊन्स) आला.
या फसवणुकीप्रकरणी पतसंस्थेने सांगली न्यायालयात खटला दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अमोल सकळे याला दोषी धरले. न्यायालयाने खालीलप्रमाणे आदेश पारित केले:
शिक्षा: ६ महिने साधी कैद.
नुकसान भरपाई: फिर्यादी संस्थेला २,५०,००० रुपये देण्याचे आदेश.
नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास आणखी एक महिना अतिरिक्त कारावास.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ४५८(२) नुसार आरोपीविरुद्ध तातडीने जेल वॉरंट काढण्याचे आदेश.
या प्रकरणी पतसंस्थेच्या वतीने ॲड. जे. एन. चौगुले यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. या निकालामुळे कर्ज बुडवून बोगस चेक देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.