सध्या महाराष्ट्रात 33 हजार 29 गृहनिर्माण प्रकल्प निर्माणाधीन आहेत. स्थावर संपदा अधिनियमानुसार प्रकल्पांच्या संबंधित विकासकांनी प्रकल्पात दर 3 महिन्याला किती सदनिका, गॅरेजची नोंदणी झाली, किती पैसे आले, किती खर्च झाले, इमारत आराखड्यात काही बदल झाले का या माहितीचा तपशील असलेले प्रपत्र 1,2 आणि 3 संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या त्रैमासिकाचे प्रगती अहवाल 20 एप्रिलपर्यंत अद्ययावत होणे आवश्यक होते. परंतु 33 हजार 29 प्रकल्पांपैकी 8212 प्रकल्पांनी हे अहवाल विहित मुदतीत अद्याप अद्ययावत केलेले नाहीत, असे महारेराच्या निदर्शनास आलेले आहे. महारेराने ग्राहकांप्रती संबंधित प्रकल्पांच्या विकासकांच्या उदासीनतेची गांभीर्याने दखल घेतली असून या सर्व संबंधित विकासकांना महारेरा अधिनियमातील कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटिसेस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना अपेक्षित प्रतिसादासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
यात नेहमीप्रमाणेच सर्वात जास्त प्रकल्प पुणे जिल्ह्याचे असून ती संख्या 1957 एवढी आहे. कोंकणसह मुंबई महानगर प्रदेशचे 4644 प्रकल्प आहेत. यात ठाण्याचे 1465, मुंबई उपनगराचे 1263 प्रकल्प आहेत. खानदेशात नाशिकच्या 451 प्रकल्पांचा, विदर्भात नागपूरच्या 391 प्रकल्पांचा आणि मराठवाड्यात संभाजीनगरच्या 185 प्रकल्पाचा समावेश आहे. 33 हजार 29 पैकी 8212 प्रकल्पांच्या विकासकांनी तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत करणे दाखवा नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत.
प्रकल्पांचा जिल्हानिहाय तपशील
कोंकणसह मुंबई महानगर प्रदेश एकूण 4644ठाणे 1475, मुंबई उपनगर 1263 , रायगड 842, पालघर 612, मुंबई शहर 267 , रत्नगिरी 125 आणि सिंधुदुर्ग 70पुणे परिसर एकूण 2311पुणे 1957, सातारा 124, कोल्हापूर 119, सांगली 63, सोलापूर 48खानदेश- 511नाशिक 451, अहिल्यानगर 44, धुळे आणि जळगाव प्रत्येकी 8विदर्भ- एकूण 483नागपूर 391, अमरावती 35,चंद्रपूर 13, अकोला 12 , बुलढाणा आणि वर्धा प्रत्येकी 10 , यवतमाळ , भंडारा , आणि वाशीम प्रत्येकी 4मराठवाडा- एकूण 238संभाजीनगर 185, लातूर 22, नांदेड 16 , जालना 6, बीड आणि जालना प्रत्येकी 6 , हिंगोली, धाराशिव आणि परभणी प्रत्येकी 1दादरा नगर हवेली- 18दमण- 7
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.