Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दस्तनोंदणी आता 'फास्ट ट्रॅक'वर! ६० खासगी केंद्रांना परवानगी; मुद्रांक शुल्काचा महत्त्वपूर्ण निर्णय!

दस्तनोंदणी आता 'फास्ट ट्रॅक'वर! ६० खासगी केंद्रांना परवानगी; मुद्रांक शुल्काचा महत्त्वपूर्ण निर्णय!


पुणे : दस्तनोंदणीसाठी गेल्यानंतर तुमचे आदरातिथ्य व्हावे, सर्व सुविधा मिळाव्यात, असे वाटत असेल, तर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क या व्यतिरिक्त पाच हजार २१८ रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ते भरल्यास सर्व सोईसुविधांसह तुमच्या वेळेची बचत होऊ शकते. कारण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नवीन दस्तनोंदणी कार्यालये खासगी तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात नव्याने ६० मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालये सुरू करण्यासाठी व ते चालवण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने या कंपनीला कार्यादेश देण्यास मंजुरी दिली आहे.

त्यानुसार 'व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेस' या कंपनीला राज्यभरात मुद्रांक शुल्क कार्यालये उभारण्याचे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे कार्यादेश दिले आहे. येथील नोंदणी ऐच्छिक असेल. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक या शहरांत ३० केंद्र सुरू होणार आहे. 

कंपनीने एका विशिष्ट संख्येपेक्षा दरमहा अधिक दस्तांची नोंदणी केली, तर त्यातून कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातून महसूल विभागालाही वाटा दिला जाणार आहे, अशी करारनाम्यात अट आहे. महसूल विभागातील एक दुय्यम निबंधक आणि एक कार्यालयीन सहाय्यक हे या कंपनीच्या कामावर देखरेख करतील, असेही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे नोंदणी उपनिरीक्षक (आयटी) अभयसिंह मोहिते यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.