Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गडकरींच्या ताफ्यात ३०-४० गाड्या! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

गडकरींच्या ताफ्यात ३०-४० गाड्या! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. कुणी मेट्रोने प्रवास करतोय तर कोणी इलेक्ट्रिक कार वापरत आहेत. तर कोणी मोटरसायकलने प्रवास करत आहेत. मात्र पंतप्रधान यांच्या आवाहनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हरताळ फासलंय. गडकरींच्या ताफ्यात अद्याप तीन गाड्या असून ज्याठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणी मात्र 40 ते 50 गाड्या असल्याचे दिसले.
बुलढाण्यात आज केंद्रीयं मंत्री प्रतापराव जाधव यांचा हस्ते मॉडेल डिग्री कॉलेजचं भूमिपूजन कार्यक्रम होता. त्यासाठी जाधव आज जिल्ह्यात आले होते. मंत्री जाधव यांच्या ताफ्यात तीन गाड्या आणि कार्यक्रमस्थळी अनेक वाहनांची उपस्थिती यावरून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला मंत्र्यांकडूनच हरताळ असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बसमधून प्रवास केला. मात्र कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा मोठा होता. पंतप्रधान मोदी यांच्या पेट्रोल बचतीच्या आवाहनानंतरही मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांची संख्या लक्षणीय असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.