Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण महा-धडाका! ​पुरावे मिटवले, पण 'पाप' कसं धुणार? बातमीच्या दणक्याने 'प्रवीण आण्णा' हादरला; रात्रीच्या अंधारात रबरी शिक्के अन् रजिस्टर लंपास!

सांगली दर्पण महा-धडाका!  पुरावे मिटवले, पण 'पाप' कसं धुणार? बातमीच्या दणक्याने 'प्रवीण आण्णा' हादरला; रात्रीच्या अंधारात रबरी शिक्के अन् रजिस्टर लंपास!


​'सांगली दर्पण'ने प्रवीण आण्णाचे काळे धंदे चव्हाट्यावर आणताच संबंधित गोटात एकच खळबळ उडाली आहे. आपली मान कायद्याच्या फासात अडकणार हे स्पष्ट दिसू लागताच, पुरावे नष्ट करण्यासाठी प्रवीण आण्णाने 'ऑपरेशन क्लीन स्वीप' राबवले. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, कारवाईच्या भीतीने रातोरात महत्त्वाची कागदपत्रे, बनावट रबरी शिक्के आणि सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्काची 'सुस्त' साथ की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
​प्रवीण आण्णाने पुरावे नष्ट करेपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमकी कसली वाट पाहत होता? विभागाचा हा 'ढिम्म' कारभार म्हणजे संबंधित गुन्हेगाराला पळवाट काढून देण्यासाठी दिलेली सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. जर विभागाने तत्काळ छापा टाकला असता, तर हे रबरी शिक्के आणि रजिस्टर आज पुरावा म्हणून तपास यंत्रणेच्या ताब्यात असते. यंत्रणेच्या या संथ गतीमुळे आता तपास नेमका होणार कसा, हा मोठा प्रश्न आहे.
पुरावे पळवले, तरी गुन्हा कसा लपवणार?

​रजिस्टर आणि शिक्के गायब केले म्हणजे आपण वाचलो, अशा भ्रमात प्रवीण आण्णाने राहू नये. कागद गायब झाले तरी त्याने केलेल्या बेकायदेशीर कृत्यांच्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. आता केवळ 'विजिट' करण्याचं नाटक न करता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.
आता चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात!
जुने प्रस्ताव आणि फाईल्सची फेरतपासणी होणार का?
​पुरावे नष्ट केल्याबद्दल प्रवीण आण्णावर गुन्हे दाखल होणार का?
​काही अधिकारी अजूनही 'आण्णा'ला वाचवण्यासाठी डोळे झाकून बसणार?

​सांगली दर्पणचा इशारा: प्रवीण आण्णाने पुराव्यांची कितीही पळवापळवी केली तरी, कायद्याचे हात लांब असतात. आता प्रशासनाने कडक कारवाई केली नाही, तर जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. आम्ही या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणारच!

​तपासाच्या नावाखाली 'खानापूर्ती' नको, आता थेट 'अ‍ॅक्शन' हवी!
क्रमश.....

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.