Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेट्रोल पंपांवर रणकंदन! इंधनासाठी ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी; राज्यात डिझेल-पेट्रोलचा तीव्र तुटवडा

पेट्रोल पंपांवर रणकंदन! इंधनासाठी ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी; राज्यात डिझेल-पेट्रोलचा तीव्र तुटवडा


अकोला : पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनधारकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याची घटना वाशीम शहरात रविवारी घडली. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी चढाओढ दिसून येते. त्यातच पेट्रोल पंपावर इंधनाचा टँकर आला. यावेळी पेट्रोल पंपावर धावपळ, धक्काबुक्की होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

नेमकं घडलं काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेचे वातावरण त्यातच मागणी वाढल्याने वाशीम जिल्ह्यात वाशीम शहर, कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव, मानोरा आदी तालुक्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. खरीप हंगामासाठी मशागतीचे कार्य सुरू आहे. यंत्रसामुग्रीला मोठ्या प्रमाणात डिझेल लागत असल्याने शेतकरी वर्ग कॅन घेऊन पंपावर दाखल होत आहेत. पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी पंपांवर मोठ-मोठ्या रांगा लागतात. इंधन घेण्यासाठी रांगत उभे असलेल्या नागरिकांचा संताप अनावर होऊन आपसात ते भिडल्याचा प्रकार वाशीम शहरात घडला. वाशीम शहरात छाबडा पेट्रोल पंपावर दोन गटामध्ये डिझेल भरण्यावरून वाद झाला.

डिझेल भरण्यासाठी मोठी रांग लागली होती. या रांगेत पुढे जाण्यावरून दोन गटामध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी चढाओढीतून वाद आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीतून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हाणामारीच्या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील सेवा विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

प्रशासकीय उपाययोजना केवळ कागदावरच
सध्या पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर परिणाम करणारी परिस्थिती निर्माण झालेली असून वाशीम जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व पेट्रोल पंप चालक व विक्रेत्यांना विविध सूचना जारी केल्या होत्या. प्रशासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत पेट्रोलियम पदार्थांची साठेबाजी अथवा कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. तसेच दररोज उपलब्ध असलेल्या इंधन साठ्याची माहिती पेट्रोल पंपावर ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसून इंधन टंचाईच्या प्रचंड झळा नागरिकांना बसत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.