Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगावात एलसीबीची धडक कारवाई: १.५ किलो गांजासह रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गजाआड; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

तासगावात एलसीबीची धडक कारवाई: १.५ किलो गांजासह रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गजाआड; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त!


​तासगाव:
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  तासगाव शहरात एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. कापूर ओढा येथील स्मशानभूमी परिसरात सापळा रचून पोलीस पथकाने रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १ किलो ५०० ग्रॅम वजनाचा तयार गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ४५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित राजू जाधव (वय २४ वर्षे, रा. एम.एस.ई.बी पाठीमागे, सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव, जि. सांगली) असे असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
​नेमकी घटना काय?

​सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

​या आदेशानुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांचे पथक २७ मे रोजी रात्री तासगाव परिसरात पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान, पोलीस अंमलदार सागर टिंगरे व दर्याबा बंडगर यांना खात्रीशीर बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित जाधव हा कापूर ओढ्या जवळील स्मशानभूमी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे.
​माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने २७ मे २०२६ रोजी रात्री ९:२५ च्या सुमारास कापूर ओढा स्मशानभूमी परिसरात अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला. काही वेळातच संशयित रोहित जाधव हातात पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क असलेल्या पोलीस पथकाने त्याला शिताफीने घेरून ताब्यात घेतले.

​१.५ किलो गांजा जप्त
​पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या हातातील पांढऱ्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात १ किलो ५०० ग्रॅम वजनाचा, हिरवट काळपट ओलसर रंगाचा, फुलबोंडे असलेला तयार गांजा आढळून आला. पोलिसांच्या कडक चौकशीत त्याने हा गांजा तासगाव परिसरात विक्रीसाठीच आणल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गांजा आणि त्याची मोटरसायकल असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
​सदरची धडक कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, तसेच अंमलदार सागर टिंगरे, दर्याबा बंडगर, सपना गराडे, सागर लबटे, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, अतुल माने, अमर नरले, संदीप गुरव, संदीप नलावडे, उदय माळी, प्रकाश पाटील, अमीर फकीर, अभिजीत गायकवाड, विक्रम खोत, सूरज थोरात, केरुबा चव्हाण, रणजित जाधव, मोतीराम खोत, शिवाजी शिद, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील यांच्या पथकाने केली.

​तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल:

आरोपी रोहित जाधव याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act १९८५) मधील कलम ८(क) आणि २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला गजाआड करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे तासगावातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.