Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-रक्षकच बनला भक्षक! ९ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस उपाधीक्षकाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई :-रक्षकच बनला भक्षक! ९ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस उपाधीक्षकाच्या मुसक्या आवळल्या


मुंबई - पोचखानवाला रोडवरील सिंग उद्यानामध्ये पोलीस उपाधीक्षकाने २३ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजता एका ९ वर्षांच्या मुलीला एकटेच खेळत असल्याचे पाहून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून पळ काढला आणि सर्व घटना आईला जाऊन सांगितली.

कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात कळवताच वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले. त्या वेळी मुलीने उपाधीक्षकांकडे बोट दाखवले. वरळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत घृणास्पद कृत्य करणार्‍या उपाधीक्षकाला अटक केली. पॉक्सो तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी उपाधीक्षकाला कह्यात घेतल्याचे पाहून त्या ठिकाणी असलेल्या एक अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे येऊन त्याच्यासमवेतही उपाधीक्षकाने असेच कृत्य केल्याचे सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.