Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'कॉक्रोच जनता पार्टी'ला ५० टक्के फॉलोअर्स पाकिस्तानचे? संस्थापक दीपके यांनी आकडेवारीसह मांडली बाजू

​'कॉक्रोच जनता पार्टी'ला ५० टक्के फॉलोअर्स पाकिस्तानचे? संस्थापक दीपके यांनी आकडेवारीसह मांडली बाजू


सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका वक्तव्याचा निषेध म्हणून जन्माला आलेल्या एका व्यंगात्मक पक्षाने देशात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या चार-पाच दिवसांत 'क्रॉक्रोच जनता पार्टी'ला समाज माध्यमांवर लाखो फॉलोअर्स मिळाले आहेत.

विशेषत: तरुणाईमध्ये पार्टीबाबत खास आकर्षण असून, विविध राजकीय नेते, कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांकडून समर्थन मिळताना दिसत आहे. पण, वेगाने प्रसिद्ध होणाऱ्या या पार्टीबाबत विविध प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. क्रॉक्रोच जनता पार्टीला पाकिस्तानमधून ५० टक्के फॉलोअर्स मिळाले असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहे दावा?
अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीला इन्स्टाग्रामवर ४९ टक्के फॉलोअर्स पाकिस्तानमधून मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्टीला भारतातून केवळ ९ लोकच फॉलो करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबात फॉलोअर्सचा एक चार्ट देखील शेअर केला जात आहे. ऋषी बागरी या एक्स युझरने याबाबत एक पोस्ट एक्सवर केली आहे.

ऋषी यांच्या एक्स बायोमध्ये त्यांच्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, असाच दावा करणारी पोस्ट भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर बग्गा यांनी एक्सवर शेअर केली आहे. बग्गा यांनी कॉक्रोच पार्टीला पाकिस्तान जनता पार्टी म्हणत डिवचले.
तजिंदर बग्गा यांची पोस्ट

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक, बोस्टनस्थित अभिजीत दीपके पाकिस्तानच्या काश्मीरविषयक नरेटिव्ह पसरवणारे आयएसआयचे पगारी खबऱ्या असल्याचे २०१९ च्या पुणे पोलिसांच्या नोंदींमध्ये नमूद करण्यात आले होते, असा आरोपही बग्गा यांनी एका पोस्टमधून केला आहे. बग्गा यांनी दीपके यांची २०२० मधील एक इन्स्टाग्रमा पोस्ट देखील शेअर केली आहे.

दीपके यांनी दिले स्पष्टीकरण
फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर दीपके यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दीपके यांनी एक आकडेवारी शेअर करत ९४.७ टक्के फॉलोअर्स भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, 'मला माहित आहे की तुम्ही खाते हॅक करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात, पण तुम्ही त्यात अयशस्वी झाला आहात. म्हणून मी तुम्हाला खरी माहिती देतो. तुम्ही ९४ टक्के भारतीय तरुणांना पाकिस्तानी का म्हणाल?', या शब्दात टीकेला उत्तर दिले.
एक्स हँडल सस्पेन्ड

दरम्यान, आज सकाळी कॉक्रोच जनता पार्टीचे अधिकृत एक्स हँडल सस्पेन्ड करण्यात आले. यानंतर काही वेळाच पुन्हा दुसरे खाते सुरु करण्यात आले. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एक्स खात्याला देखील काही तासांत जवळपास ७० हजार नेटकऱ्यांनी फॉलो केले आहे. कॉक्रोच जनता पार्टीला अवघ्या काही दिवसांत १६.६ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.