पंगत वाढली, डोकं फिरलं! जेवणात टाकला जमालगोटा; मग वऱ्हाड्यांनी जेवणापेक्षा 'तिथेच' जास्त फेऱ्या मारल्या!
हल्ली भारतात लग्न सोहळे फार भव्य आणि खर्चिक झाले आहेत. पण गावाकडे अजून कमी वऱ्हाडामध्ये लग्न केले जातात. लग्न ठरल्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोक किती लोक लग्नाला येणार याबद्दल आकडा ठरवला जातो. खासकरुन वराकडून किती वऱ्हाड येणार याचा एक आकडा दिला जातो. त्यानंतर वधू पक्षाने जे काही केलं त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लग्नात नवरदेव अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे त्यांनी 100 ऐवजी 200 पाहुणे आणले म्हणून वधूच्या वडिलांचं जेवणाचे गणित बिघडलं. त्यानंतर त्यांनी जे काही पाऊल उचलं ते धक्कादायक होतं. त्यांनी रागाच्या भरात वधू पक्षाने नवरदेवाकडील पाहुण्यांच्या जेवणात जमालगोटा मिक्स केला. त्यानंतर संपूर्ण वऱ्हाड पोट धरून जवळच असलेल्या नदीच्या काठी पळत सुटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मिडिया रिपोर्टनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा बिहारमधील सिवाणमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव दुप्पट वऱ्हाड घेऊन लग्नासाठी आलं म्हणून वधूपक्षाने हे कृत्य केलं. 100 ऐवजी 200 पाहुणे आल्यामुळे वधूचे वडील यांनी ठरवलेला लग्नाचा खर्च वाढला. त्यामुळे त्यांनी जेवण्यात जमालगोटा मिक्स केला आणि त्यानंतर मंडपात एकच गोंधळ निर्माण झाला. जेवण केल्यानंतर पाहुण्यांचं पोट खराब झाले आणि त्यांना जुलाब व्हायला लागली. त्यामुळे लोक मंडप सोडून शौचासाठी पळायला लागले. त्यातच या घटनेचा व्हिडीओ कोणी तरी काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.भारतात आजही अनेक ठिकाणी लग्नाचा खर्च हा वधूपक्षाकडे असतो. अशात वधूपक्षाचे एक बजेट ठरलेले असतं. त्यात जर सांगून सुद्धा अचानक वराकडील लोक अनेक वेळा अनपेक्षित मागण्या किंवा सांगितलेल्या वऱ्हाडापेक्षा अधिक लोक घेऊन येणं. यामुळे वधूपक्षावर आर्थिक ताण वाढतो. त्यातून रागाच्या भरात अनेक वेळा अशा प्रकराचे घटना घडतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.