Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! सांगलीत नराधमाचा हैवानियत: पुण्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न असतानाच सांगलीत ८ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार!​

Big Breaking! सांगलीत नराधमाचा हैवानियत: पुण्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न असतानाच सांगलीत ८ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार!


सांगली :- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असतानाच, सांगली शहरातूनही एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाच्या कृत्यामुळे पुणे हादरलेले असताना, आता सांगलीत एका ८ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
आईच्या विनयभंगातून समोर आले धक्कादायक वास्तव ही हृदयद्रावक घटना सांगली शहरात घडली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलीच्या आईचा विनयभंग झाल्यानंतर या भीषण अत्याचाराचा उलगडा झाला. आरोपी विक्रांत शंकर बाबर उर्फ छोट्या याने केवळ आईचा विनयभंग केला नाही, तर त्याआधी तिच्या ८ वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवले होते.
नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी पीडित महिला आपल्या लहान मुलीसह घरात असताना तिने सुरक्षेसाठी दरवाजा लावून घेतला होता. याचाच राग मनात धरून आरोपी विक्रांत बाबर याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. घरात सुरू असलेला हा राडा आणि आरोपीची दहशत पाहून पीडित चिमुरडी प्रचंड घाबरली आणि ओक्सोबोक्षी रडू लागली.

​आईने जेव्हा मुलीला इतक्या दहशतीत असण्याचे कारण विचारले, तेव्हा त्या चिमुरडीने आपल्यासोबत घडलेला विदारक प्रकार सांगितला. आरोपी बाबर याने आपल्यासोबत अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने सांगताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

​पोलीस कारवाई आणि जनक्षोभ
मुलीने दिलेल्या माहितीनंतर पीडित मातेने विलंब न लावता पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सांगली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नराधम विक्रांत बाबर याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

​पुण्यातील घटनेची जखम ताजी असतानाच सांगलीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, अशा नराधमांना भरचौकात कठोर शासन व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सांगली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.