Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं!" मनोज जरांगे पाटलांचा घणाघात; पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार!

"देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं!" मनोज जरांगे पाटलांचा घणाघात; पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार!


ज्या ज्या वेळेस मुंबईला गेलो, तेव्हा हैदराबादचा जीआर  काढला अंबलबजावणीकेली. तेव्हा आम्ही सरकारचा कौतुक केलं. त्याच्यानंतर 108 प्रमाणपत्र वाटली. मात्र त्याच्यानंतर काय? सातारा संस्थानचा जीआर एक महिन्यात काढू म्हटले होते. त्याला आठ महिने उलटून गेले. राज्यातीलसर्व गुन्हे मागे घेऊ म्हटले ते अद्याप का घेतले नाहीत? ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांना व्हॅलिडीटी दिली जात नाही. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. हेसर्व नेमकं काय चाललंय? मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना मतं आणि नेते मराठ्यांचे लागतात, मात्र त्याच भाजपमधल्या  मराठ्यांचे लेकरं बाळ मोठे होऊ नयेत ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची द्वेषाने भरलेली असल्याचेसांगत, मराठाआंदोलकमनोजजरांगेपाटील यांनीजोरदारटीकाकेलीआहे.

 देवेंद्र फडणीसांमुळे नेकनुरला एकाचा बळी गेलाय, मराठ्यांपुढे या राज्यात शहाणपणा चालत नाही
देवेंद्र फडणीसांमुळे नेकनुरला एकाचा बळी गेलाय. देवेंद्र फडणवीस यांची वर्तवणूकच चांगली नाही. खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही त्यांच्यावर दबाव आणणार. मात्रआम्ही न्याय मिळेपर्यंत हटणार नाहीत. मराठ्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे. तुम्हाला वाटत असेल सत्ता आहे, पण मराठ्यांपुढे या राज्यात शहाणपणा चालत नाही. आंदोलनाची तारीख डिक्लेअर होईल. सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं आहे की हे फडणवीस आपल्या लेकरांचं वाटोळ करत आहे. आम्ही ताकतीने हा मुद्दा लावून धरू. बघू हे लोक किती शहाणपणा करतात ते. असेही मनोजजरांगे पाटील म्हणाले.

सातारा संस्थानचा गॅझेटेडचा जीआर कसा निघत नाही. आता आम्ही बघतो यांच्याकडे, यांना दाखवतो आम्ही कोणआहोतते. देवेंद्र फडणवीस यांनी आणखी आमचे बळी घेऊ नये. आमची लेकरं सोन्यासारखी आहे. तुमचे लेकरं जसे तुम्हाला आपले वाटते, तसे आमचे लेकर सुद्धा आम्हाला सोन्यासारखे वाटतात. तुमचं लेकरू तेच लेकरू आणि दुसऱ्याचे लेकरू मेल तरी चालेल, या भूमिकेतून देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर पडावं. असेही मनोज जरांगेपाटील म्हणाले.
अंतरवाली सराटीमध्ये बैठक, आंदोलनाची तारीख आज जाहीर करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून आज (16 मे) अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची बैठक होणार आहे. कुणबी नोंदी असलेल्याना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं, तसेच व्हॅलेडीटी तात्काळ देऊन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, शिंदे समितीने रेकॉर्ड शोधावेत, यासह इतर मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याचा निर्धार मनोज जरंगे यांनी केला आहे, आज सकाळी दहा वाजता मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक ठेवली असून या बैठकीमध्ये आंदोलनाची तारीख जाहीर होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार का? का वेगळा आंदोलनाचा मार्ग निवडणार, हे बैठकीनंतर मनोज जरांगे स्पष्ट करतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.