Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सैराटमधील ‘सल्या’ अडकला लग्नाच्या बेडीत; अरबाज शेखच्या निकाहवर रिंकू राजगुरूची कमेंट चर्चेत!

सैराटमधील ‘सल्या’ अडकला लग्नाच्या बेडीत; अरबाज शेखच्या निकाहवर रिंकू राजगुरूची कमेंट चर्चेत!

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवला. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याइतकीच लोकप्रिय झालेली व्यक्तिरेखा म्हणजे 'सल्या'.
सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख आता विवाहबंधनात अडकला आहे. अरबाजने त्याची मैत्रीण सिमरन हिच्याशी नुकताच निकाह केला. लग्नाच्या फोटोंमध्ये हे जोडपे सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये 'ट्विनिंग' करताना दिसत असून अत्यंत सुंदर दिसत आहेत. अरबाजने आनंदाची बातमी शेअर करताच, 'सैराट'मधील त्याची सहकलाकार रिंकू राजगुरूने केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

'सैराट' चित्रपटात परश्याचा मित्र 'सल्या' ही भूमिका साकारून अभिनेता अरबाज शेखला लोकप्रियता मिळाली. नुकतीच सैराटला १० वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटातील लंगड्या म्हणजे तानाजी गळगुंडेच्या पत्नीने मुलाचा फोटो पोस्ट करून त्याची पहिली झलक दाखवली. आता अरबाज शेखने आनंदाची बातमी दिली आहे. अरबाज शेखने लग्न केलं आहे. अरबाजने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अरबाज शेखने त्याची गर्लफ्रेंड सिमरन हिच्याशी निकाह केला आहे. अरबाजने शेअर केलेल्या फोटोत तो व सिमरन ट्विनिंग करताना दिसत आहेत. सिमरनने सोनेरी साडी नेसली असून अरबाजने सोनेरी शेरवानी घातली आहे. फोटोत ते दोघेही सुंदर दिसत आहेत. एका फोटोत सिमरनने सेल्फी घेतली असून अरबाज पोज देतोय. सिमरनच्या हातात पुष्पगुच्छ आहे.
अरबाज शेखने लग्नाचे फोटो शेअर करताना 'Just Us' व रेड हार्ट इमोजी असं कॅप्शन लिहिलं. अरबाजने ही गुड न्यूज शेअर करताच चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अरबाजच्या लग्नाच्या फोटोंवर आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने रेड हार्ट इमोजीची कमेंट केली आहे. अरबाजच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

दरम्यान, 'सैराट' चित्रपटानंतर अरबाजने बरेच मराठी चित्रपट केले. यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिरयानी, झुंड, एकदम कडक अशा अनेक चित्रपटात त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. इतकंच नाही तर प्राइम व्हिडीओवर अलीकडेच आलेल्या 'मटका किंग' या विजय वर्माच्या सीरिजमध्येही अरबाज झळकला. अरबाजने अभिनयाच्या जोडीला व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ 'बेक बडीज' या नावाने केक आणि कॅफे सुरू केला होता. अरबाज व सिमरन गेल्या ३-४ वर्षांपासून एकत्र होते, अखेर दोघांनी निकाह करून त्यांचा नवीन प्रवास सुरू केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.