Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काळजाचा ठोका चुकवणारा भीषण स्फोट! आगीच्या ज्वालांमध्ये १३ जण होरपळले; परिसरात रक्ताचा सडा आणि किंकाळ्या!

काळजाचा ठोका चुकवणारा भीषण स्फोट! आगीच्या ज्वालांमध्ये १३ जण होरपळले; परिसरात रक्ताचा सडा आणि किंकाळ्या!


ऐक दोन नाही तर अचानक 12 स्फोट झाले, त्यात टँकर, कार आणि दुचाकीही जळून खाक झाल्या. पेट्रोल पंपावर आगीचा अक्षरश: भडका उडाला. ही आग नेमकी कशामुळे लागली ते समजलं नाही. मात्र एका क्षणात आगीचा भडका इतका मोठा उडाला की जे दिले त्याला कवेत घेत आग पुढे सरकत होती. तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशम दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अटोकाट प्रयत्न केले. या आगीत आतापर्यंत 13 जण होरपळल्याची माहिती मिळाली आहे तर 12 गाड्यांचं नुकसान झालं.

नेमकी कशी लागली आग?

प्रत्यक्षदर्श्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार पेट्रोल भरून पंपाच्या बाहेर पडत असताना अचानक त्याच्या गाडीने पेट घेतला. घाबरलेल्या त्या तरुणाने गाडी तिथेच सोडून पळ काढला, मात्र ती पेटती दुचाकी लुढकत जाऊन तिथेच उभ्या असलेल्या पेट्रोलच्या टँकरला धडकली. टँकरच्या संपर्कात येताच आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता आसपासच्या १०-१२ दुचाकींनाही आगीने कचाट्यात घेतले. 

कुठे घडली घटना?
राजगड जिल्ह्यातील पचोर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या 'चुन्नालाल-मुन्नालाल भारत पेट्रोल पंपा'वर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. ज्यावेळी ही आग लागली, तेव्हा पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आग लागल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं.
पोलीस तपासावर भर

आग नेमकी कशामुळे लागली, याचे तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज आणि सुरक्षा नियमांची तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण पचोर शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.