Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-नूतन पोलीस अधीक्षकांचा 'सपाटा'! माधवनगरमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश; आता 'त्या' बड्या शुक्राचार्याचा नंबर लागणार?

सांगली :- नूतन पोलीस अधीक्षकांचा 'सपाटा'! माधवनगरमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश; आता 'त्या' बड्या शुक्राचार्याचा नंबर लागणार?


सांगली:  सांगली जिल्ह्यात अनैतिक व्यवसायांनी डोके वर काढले असतानाच, 'अनैतिक मानवी वाहतूक विरोधी पथकाने' माधवनगरमध्ये मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे. संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी भरधाव छापा टाकत हा काळा बाजार उखडून टाकला आहे. या कारवाईमुळे केवळ गुन्हेगारांचेच नव्हे, तर या धंद्याला छुप्या रीतीने पाठबळ देणाऱ्या 'झारीतील शुक्राचार्या'चेही धाबे दणाणले आहेत.

​नेमकी कारवाई काय? 
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने माधवनगर येथील संबंधित लॉजवर अचानक छापा टाकला. पोलीस पथक धडकताच लॉज परिसरात एकच खळबळ उडाली. या छाप्यात अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याचे धक्कादायक पुरावे हाती लागले असून, पोलिसांनी घटनास्थळावरून संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

​'शुक्राचार्य' रडारवर! या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या धंद्यामागे असलेल्या एका बड्या 'शुक्राचार्या'चे नाव आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. या पाठीराख्याच्या आशीर्वादानेच हा अनैतिक व्यापार आजवर बिनदिक्कत सुरू होता. मात्र, पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या "व्हाईट कॉलर" गुन्हेगाराचे साम्राज्य आता धोक्यात आले आहे.

​नूतन पोलीस अधीक्षकांचा कडक संदेश सांगलीच्या नूतन पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'ची भूमिका घेतली आहे. ही कारवाई म्हणजे जिल्ह्यातील सर्व अवैध धंदेवाल्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. जनतेतून या कारवाईचे जोरदार स्वागत होत असून, "आता फक्त चेल्यांवर नाही, तर त्या मुख्य सूत्रधारावर (शुक्राचार्यावर) थेट कारवाई करा," अशी मागणी जोर धरू लागली आहे. ​सांगली पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये असून, या प्रकरणाचा पुढील तपास अधिक वेगाने सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.