Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"जागतिक आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक, प्रत्येकाने सजग राहण्याची गरज: नेदरलँड्समध्ये पंतप्रधान मोदींचे आवाहन"

"जागतिक आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक, प्रत्येकाने सजग राहण्याची गरज: नेदरलँड्समध्ये पंतप्रधान मोदींचे आवाहन"


जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्ध सुरू झाले, आता ऊर्जा संकट आहे. हे दशक जगासाठी आपत्तीचे दशक ठरत आहे. परिस्थिती बिकट आहे. आपल्याला गरिबीची तयारी ठेवावी लागेल, अशी भीती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. देशवासीयांना वर्षभर परदेश प्रवास करू नका, असा सल्ला देऊन मोदी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. नेदरलँडस् येथे एका कार्यक्रमात त्यांनी गरिबीचा धोका सांगितला. त्यानंतर भारतातील लोकांचे धाबे दणाणले आहे.
पंतप्रधान मोदी हे यांनी नेदरलँडस्मधील अनिवासी भारतीय नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता धडकी भरणारा इशारा दिला. मोदींनी जगावरील संकटासंदर्भात सांगितले की, जग अनेक नव्या आव्हानांचा सामना करत आहे. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्ध सुरू झाले, आता ऊर्जा संकट आहे. हे दशक जगासाठी आपत्तीचे ठरत आहे. ही परिस्थिती वेगाने न बदलल्यास गेल्या अनेक दशकांमध्ये केलेले चांगले काम वाया जाईल. जगातील मोठी लोकसंख्या गरिबीच्या दलदलीत पुन्हा जाईल, असा इशारा मोदी यांनी दिला.

लवचिक पुरवठा साखळीसाठी प्रयत्नशील

आज जगाला परिस्थितीनुसार बदलणारी लवचिक पुरवठा साखळी हवी आहे. अशा वेळी भारत आणि नेदरलँड मिळून एक विश्वसनीय पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऊर्जेपासून पाण्याच्या सुरक्षेसाठी तसेच हरित हायड्रोजनसाठी दोन्ही देश काम करत आहेत. युरोपियन महासंघासोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी मजबूत होईल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

परवानगीशिवाय चांदीची आयात नाही
मोदी सरकारने सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आता चांदीच्या आयातीवर निर्बंध टाकले आहेत. त्यानुसार, चांदीच्या विविध प्रकारांना फ्री आयात धोरणातून काढून टाकण्यात आले आहे. त्यानुसार, चांदीची लगदी, अर्ध प्रक्रिया केलेली चांदी, नैसर्गिक तसेच पावडर स्वरूपातील चांदीच्या आयातीसाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. सरकारच्या परवानगीशिवाय या प्रकारची चांदी आयात करता येणार नाही. प्लॅटिनमचाही या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. नेदरलँडस् दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेथील अनिवासी भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रमदेखील नागरिकांनी सादर केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.