सांगली दर्पण Exclusive!
धक्कादायक: राज्य उत्पादन शुल्क विभागात 'रात्रीस खेळ चाले'; प्रवीण अण्णा आणि वरिष्ठांच्या गुप्त भेटीने प्रशासनाचे वाभाडे!
सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागातील तथाकथित 'मलिदा' राजकारण आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विभागाची प्रतिमा मलीन होत असतानाच, काल रात्री 'प्रवीण अण्णा' नावाच्या एका वादग्रस्त पात्राने मध्यरात्रीच्या अंधारात एका बड्या वरिष्ठाच्या घरी धाव घेतल्याने संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, स्वामी विवेकानंद चौक परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी वास्तव्यास आहेत. काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी प्रवीण अण्णाची टूव्हीलर अपार्टमेंटच्या बाहेर पार्क केलेली दिसून आली. ऑफिसमधील एक महत्त्वाची बातमी लागताच, अण्णांनी कोणाचीही पर्वा न करता थेट साहेबांचे घर गाठले.
चर्चेतील 'ती' १० तारीख आणि मलिद्याचा हिशोब
नागरिकांमध्ये आता या भेटीवरून उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही 'काळेबेरे' आहे?
बदनामी रोखण्याचा प्रयत्न? विभागाची गेल्या काही दिवसांपासून जी बदनामी सुरू आहे, ती मॅनेज करण्यासाठी ही फिल्डिंग लावली गेली का? हफ्त्याची वसुली? १० तारखेच्या आत 'वरिष्ठ' स्तरावर जो 'मलिदा' पोहचवायचा असतो, त्यासाठीच ही रात्रीची धावपळ होती का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
विभागाची प्रतिमा पणाला
एकीकडे पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारे मध्यरात्री अधिकाऱ्यांच्या घरी होणाऱ्या भेटीगाठी विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. या भेटीत नक्की काय घडलं? कोणती फाईल सरकवली गेली की कोणत्या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालं? याचे उत्तर आता सर्वसामान्य जनता शोधत आहे. आता पाहायचे हे की, या 'अर्थ'पूर्ण भेटीवर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करते की 'मलिदा' संस्कृती अशीच जोमाने सुरू राहते!क्रमश....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.