Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! सांगली :- राज्य उत्पादन शुल्काचा सुस्त कारभार; संधी मिळताच प्रवीण आण्णाने रबरी शिक्के अन् रजिस्टर केले गायब!

सांगली दर्पण Exclusive!  सांगली :- राज्य उत्पादन शुल्काचा सुस्त कारभार; संधी मिळताच प्रवीण आण्णाने रबरी शिक्के अन् रजिस्टर केले गायब!


पुरावे नष्ट केले तरी 'पाप' कसं लपवणार? प्रवीण आण्णाने रातोरात गायब केले रबरी शिक्के आणि रजिस्टर! 'सांगली दर्पण'ने प्रसिद्ध केलेल्या चपराक देणाऱ्या बातमीचा प्रवीण आण्णाने इतका धसका घेतला आहे की, आपले काळेबेरे उघड होऊ नये म्हणून त्याने आता पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. कालच्या बातमीने धाबे दणाणलेल्या प्रवीण आण्णाने तत्काळ रबरी शिक्के, महत्त्वाची रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

​यंत्रणेच्या ढिम्म कारभाराचा फायदा?

खरे तर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळीच गांभीर्याने लक्ष दिले असते, तर हे सर्व पुरावे आज तपास यंत्रणेच्या हाती लागले असते. परंतु, विभागाच्या संथ गतीचा फायदा घेत प्रवीण आण्णाने सर्व पुरावे ठिकाणाहून हटवले आहेत. आता राज्य उत्पादन शुल्काच्या हाती तिथे काहीही लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अजूनही वेळ गेलेली नाही!
प्रवीण आण्णाने कितीही हातपाय मारले आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे कारनामे आता लपून राहणार नाहीत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी आता स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. केवळ जागेवर जाऊन पाहणी करण्यापेक्षा, या प्रकरणाशी संबंधित सर्व जुन्या प्रस्तावांची आणि कागदपत्रांची सखोल चौकशी केल्यास प्रवीण आण्णाचे सर्व 'काळेबेरे' जगासमोर येतील. ​प्रवीण आण्णाने पुराव्यांची पळवापळवी केली असली तरी, कायद्याच्या कचाट्यातून तो वाचणार का? की वरिष्ठ अधिकारी अजूनही डोळे झाकून बसणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रमश.....


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.