Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! ​खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम यांच्या आशीर्वादाने मंगेश चव्हाणांचा धडाका; 'ऑन द स्पॉट' निकालामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत!

सांगली दर्पण Exclusive! ​खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम यांच्या आशीर्वादाने मंगेश चव्हाणांचा धडाका; 'ऑन द स्पॉट' निकालामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत!


सांगली :- नगरसेवक कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगेश चव्हाण. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने आपला प्रभाग आदर्श करण्यासाठी झटणारे चव्हाण सध्या सांगलीकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. "मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश" अशी भावना व्यक्त करत आजची तरुणाई त्यांच्या कार्यशैलीवर फिदा झाली आहे.


पहाटे फिटनेस, मग जनसेवा
मंगेश चव्हाण यांचा दिनक्रम पहाटेपासूनच अत्यंत शिस्तबद्ध असतो. शिवाजी स्टेडियमवर रॅनिंग, वॉर्मअप आणि त्यानंतर जिम व व्हॉलीबॉल असा फिटनेसचा तडाखा दिल्यानंतर, ते वेळ न घालवता त्याच ट्रॅक पॅन्टवर आपल्या प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर पडतात. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार "जनता हाच केंद्रबिंदू" मानून ते संपूर्ण वॉर्ड पिंजून काढतात आणि लोकांच्या अडीअडचणी तात्काळ निकाली लावतात.
​आरोग्यसेवेसाठी सदैव तत्पर

मग ते सिव्हिल हॉस्पिटल असो वा एखादे खाजगी रुग्णालय, आपल्या प्रभागातील रुग्ण दाखल झाल्याची माहिती मिळताच मंगेश चव्हाण तिथे हजर होतात. संबंधित डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून रुग्णाला योग्य उपचार मिळतात की नाही, याची खातरजमा करतात. रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर देऊन मगच ते आपल्या पुढील कामासाठी रवाना होतात.

बुलंद आवाज आणि खंबीर नेतृत्व
महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यात चव्हाण यांचा हातखंडा आहे. खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम यांच्या रूपाने मिळालेल्या खंबीर नेतृत्वामुळेच मंगेश चव्हाण अधिक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहेत. केवळ राजकारणात न अडकता थेट लोकांच्या बांधावर जाऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ते खऱ्या अर्थाने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ​आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा हा 'अवलिया' लोकप्रतिनिधी सध्या सांगली शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.