अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
कर्नाटक: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत देशाला हादरवून सोडणारी माहिती समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
काय नेमकं प्रकरण?
हरिहर परिसरातून ताब्यात घेतलेल्या सुहैल नावाच्या तरुणाची विविध सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात त्याच्या मोबाईलमधून काही संशयास्पद माहिती आणि संपर्क मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. चौकशीत त्याने ‘अयोध्येतील श्रीराम मंदिरात स्फोट घडवून आणण्याची माझी इच्छा होती’, असे सांगितल्याचे सूत्रांनी नामूद केले आहे. या कथित कबुलीबाबत अधिकृत तपास यंत्रणांनी अद्याप सार्वजनिकरित्या सविस्तर माहिती दिलेली नाही.
मोबाईल तपासणीत काय सापडलं?
सुहैलच्या मोबाईल फोनमधून अनेक संशयास्पद माहिती समोर आली आहे. त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानचा कंट्री कोड असलेल्या मोबाईल क्रमांकाची नोंद ‘राणा बॉय’ या नावाने सेव्ह असल्याचे आढळले. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया गट, शस्त्रास्त्रांसह काढलेली छायाचित्रे आणि काही गुप्त ऑनलाइन गटांमधील सक्रिय सहभागाचे पुरावे मिळाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
‘मेनन अँड जित्तू -३३३’ आणि ‘राणाभाई – ३३३’ गटांशी संबंध?
पोलिस तपासात सुहैल हा ‘मेनन अँड जित्तू-३३३’ आणि ‘राणाभाई-३३३’ नावाच्या संशयास्पद ऑनलाइन गटांमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याचे वृत्त आहे. या गटांद्वारे देशविघातक कारवाया, कट्टरतावादी विचारांचा प्रसार आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्कशी संपर्क ठेवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस तपासात सुहैल हा ‘मेनन अँड जित्तू-३३३’ आणि ‘राणाभाई-३३३’ नावाच्या संशयास्पद ऑनलाइन गटांमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याचे वृत्त आहे. या गटांद्वारे देशविघातक कारवाया, कट्टरतावादी विचारांचा प्रसार आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्कशी संपर्क ठेवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुहैल पेंटरच्या वेशात
सुहैल हा उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर परिसरातील रहिवासी असून तो हरिहरजवळील औद्योगिक भागातील एका कारखान्यात पेंटर म्हणून काम करत होता. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. अधिक तपासासाठी सुहैलला मंगळवारी सायंकाळी तुमकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. सुहैल आणि त्याच्या संपर्कातील काही व्यक्ती भारतात विध्वंसक कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त केला जात आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशातील अत्यंत संवेदनशील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतले जात असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथके आणि राज्य पोलिस यांच्यात समन्वयाने तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.