Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुकाराम मुंढेंचा 'दणका'! ॲमेझॉन गोदामावर थेट छापा, विषारी अन्नाचा साठा जप्त; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल!

तुकाराम मुंढेंचा 'दणका'! ॲमेझॉन गोदामावर थेट छापा, विषारी अन्नाचा साठा जप्त; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल!


तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा धडाका लावत महिन्याभरात तब्बल 34 कोटींचा गुटखा जप्त केला आहे. तर आतापर्यंत 457 जणांना अटक करत 322 आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे. या कारवाईत अहिल्यानगरमधील शिर्डीसह इतर प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. यामुळे या धडक कारवाईंची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. 
अशातच कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी ॲमेझॉन कंपनीच्या गोदामावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईनंतर आता राज्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याची चर्चा रंगली आहे. तर विभागाच्या या धडाकेबाज कारवाईने अनेकांने धाबे दणाणले आहेत.
नुकताच तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयाने शिर्डीत पुन्हा एकदा मोठी कारवाई केली होती. येथे विभागाने तब्बल 700 किलोहून अधिक पेढ्यांचा साठा जप्त केला होता. ज्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाहे दणाणले आहेत. अशातच अन्न व औषध प्रशासन विभागाने पुन्हा एकदा भिवंडी येथे मोठी कारवाई करत ॲमेझॉन रिटेल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीला दणका दिला आहे.

भिवंडीतील सरलगाव परिसरातील गोदामावर छापा टाकत विभागाने छापा टाकला. यावेळी कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर कोनगाव पोलिस ठाण्यात ॲमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकासह दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान काहीच दिवसांपुर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माणकोली-दापोडे भागात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा भिवंडीतील सरलगाव परिसरातील ॲमेझॉन कंपनीच्या गोदामावर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान विभागाने केलेल्या तपासणी (२४ जून २०२६ रोजी) आर. के. ट्रेडर्सचे मालक रहमान के. यांनी करारातील अटींचे पालन न करता कालबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच अन्नपदार्थांची विल्हेवाट लावल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचेही समोर आले.
तर या प्रकरणात ॲमेझॉन पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नुरसह कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी पोलिस तक्रार दिली असून व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.