Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझी मुलगी दोषी असेल तर.; आरोपी सियाच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया, तिच्या आईने केले केतनचे कौतुक

माझी मुलगी दोषी असेल तर.; आरोपी सियाच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया, तिच्या आईने केले केतनचे कौतुक


पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. आधी अपघात वाटणारी ही घटना घातपाताकडे वळल्याने या प्रकारांची जोरदार चर्चा आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी रचलेल्या कटाचा पर्दाफाश झाला. यानंतर अखेर सिया गोयलच्या आई वडिलांची प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. माझी मुलगी सिया दोषी असेल तर तिला गडावरून ढकलून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया तिचे वडील प्रवीण गोयल यांनी व्यक्त केली आहे. तर, केतन हा आम्हाला जावयाप्रमाणे नव्हे तर मुलासारखा होता, अशी भावना तिच्या आईने व्यक्त केली आहे.

"केतन एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती होता. तो मुलांपेक्षाही जास्त आमचा आदर करत होता. आमच्या कुटुंबाला केतन खूप प्रेम दिले. या घृणास्पद गुन्ह्यासाठी जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे." अशी मागणी सियाच्या आईने केली आहे. "केतन हा माझा जावई नव्हता तर तो माझा मुलगा होता. माझा स्वतःचा मुलानेही माझ्यावर कधी इतके प्रेम केले नसेल, जितके केतनने केले. केतनची हत्या ज्याने कोणी केली आहे, त्याला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे. हे कृत्य नेमके कोणी केले, हे त्या देवालाच ठाऊक." असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सियाचे वडील म्हणाले की, "जे कोणी आरोपी आहेत, त्यांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयात जर हत्या केल्याचे सिद्ध झाले, तर तिलाही शिक्षा द्या, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे. ती दोषी आढळली तर तिलाही केतनप्रमाणे गडावरून ढकलून द्या," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. पण सियाचे वडील पुढे म्हणाले की, आमच्या मुलीचे केतनवर प्रेम होते त्यामुळे ती असे करू शकत नाही. सिया केतनला लोहगडावरून घेऊन गेलीच नाही. उद्या आपल्याला महाबळेश्वरला जायचे असल्याचे सांगत आपण थकून जाऊ. सियाने लोहगडावर जाण्यास नकार दिला होता. सियाने चॅट देखील दाखवले होते. केतनने अनेक फोन केल्यानंतर सिया तयार झाली होती." असा दावा त्यांनी यावेळी केल्याने आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. सध्या आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीत काय समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.