मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मंगळवारी झालेल्या बदलीला आज दुसऱयाच दिवशी स्थगिती देण्यात आली आहे. अश्विनी जोशी यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी झाली होती.
मात्र त्यांच्या जागी पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेल्या प्राजक्ता वर्मा यांनी पालिकेत येण्यास स्वारस्य दाखवले नसल्याने जोशी यांच्या बदलीला स्थगिती दिल्याचे समजते. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी 12 सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. यानुसार डॉ. जोशी यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश दिला होता. अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती ही काही तांत्रिक बाबीसाठी दिल्याचे सरकारी पातळीवरून सांगण्यात येत आहे. शिवाय एसआयआर प्रक्रियेसाठी अश्विनी जोशी प्राधिकृत असल्याने निवडणूक आयोगाकडून मान्यता घेईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे. या तांत्रिक बाबी पूर्ण होताच बदलीवरील स्थगिती उठवली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.