Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजयकाकांचा 'मास्टरस्ट्रोक'! पराभवाचा बदला घेण्यासाठी 'या' दिवशी करणार भाजपमध्ये अधिकृत प्रवेश; फडणवीस राहणार उपस्थित

संजयकाकांचा 'मास्टरस्ट्रोक'! पराभवाचा बदला घेण्यासाठी 'या' दिवशी करणार भाजपमध्ये अधिकृत प्रवेश; फडणवीस राहणार उपस्थित


सांगली : माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस जून रोजी  त्यांचा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विटा येथील दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकी वेळी संजय पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी तासगाव नगरपालिका, तसेच तासगाव पंचायत समितीमध्ये सत्ता आणून पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

दरम्यानच्या काळात माजी खासदार संजय पाटील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते. मात्र त्यांचा प्रवेश लांबला होता. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीवेळीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपला साथ दिली. त्यानंतर त्यांचे भाजपशी जवळीक पुन्हा वाढली. त्यांचा प्रवेश होत नव्हता.

दरम्यान, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शनिवारी कऱ्हाड येथे आले होते. तेथे त्यांची माजी खासदार संजय पाटील यांच्याशी भेट झाली. त्यानंतर दुपारी पुन्हा विट्यातही त्यांची भेट झाली आणि भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत संजय पाटील यांचा ३० जून रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याबाबत चर्चा झाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.