Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"भक्तांनंतर आता थेट देवालाही लुटलं!" राम मंदिर देणगी महाघोटाळ्यावरून मुकेश खन्नांचा संतापाचा भडका

​"भक्तांनंतर आता थेट देवालाही लुटलं!" राम मंदिर देणगी महाघोटाळ्यावरून मुकेश खन्नांचा संतापाचा भडका


मुंबई: अयोध्या राम मंदिराच्या एसआयटी तपासात एक मोठा खुलासा झाला असून, राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मंदिरातील देणगीच्या नावाखाली झालेल्या या घोटाळ्याचा सर्वांनी संताप व्यक्त करत निषेध केला आहे. यानंतर, उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) यांनी तातडीनं कारवाई सुरू केली आहे. 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांनीही या वादावर प्रतिक्रिया देत जनतेला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

मुकेश खन्ना यांचं जनतेला आवाहन

मुकेश खन्ना यांनी राम मंदिर घोटाळ्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, 'तुम्हाला माहित आहे का, मंदिरांमध्ये तुम्ही दिलेली रोख देणगी देवापर्यंत पोहोचतच नाही. ती मध्येच कुठेतरी गायब होते. सगळीकडे लूटमार सुरू आहे. 'लूट सको तो लूट लो' अशी एक म्हण आहे आणि लूटणारे लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. मी एकदा म्हटलेलं, 'भरे पड़े हैं चोर, डाकू और बेईमान, फिर भी मेरा देश है महान.' पण देणगी लुटणाऱ्या या लोकांना मी कोणतं नाव देऊ? चोर, डाकू की बेईमान? यापैकी काहीच नाही, कारण हे लोक या सगळ्याच्या पलीकडचे आहेत.'

मुकेश खन्ना यांचा सल्ला
'हे फक्त भक्तांनाच नाही, तर देवालाही लुटत आहेत. मी भक्तांना एवढाच सल्ला देईन की, तुम्ही देणगी देणं बंद केलं, तर घोटाळाही होणार नाही. त्यामुळे मंदिरांमध्ये देणगी, खासकरून पैसे आणि दागिने अर्पण करणं बंद करा. यातच देवाला आनंद होईल.' असंही मुकेश यांनी पुढे म्हटलंय.

दरम्यान, संपूर्ण अयोध्या राम मंदिर नैवेद्य घोटाळ्यासंदर्भात, एसआयटीनं अलीकडेच १५ पानी अहवाल सादर केला आहे, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. गेल्या ४० दिवसांत ७० वेळा देणगी चोरीला गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस छाप्यांमध्ये आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.