सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “मुख्य अग्निशमन अधिकारी, श्रेणी-०१” पदाची०१रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका भरती 2026 करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१२ जुलै २०२६) आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका भरती 2026
पदाचे नाव - मुख्य अग्निशमन अधिकारी, श्रेणी-०१पदसंख्या - ०१जागाशैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)नोकरी ठिकाण -सांगलीअर्ज पद्धती -ऑफलाईनअर्ज पाठविण्याचा पत्ता - आरसीएच कार्यालय, आपटा पोलिस चौकीशेजारी, पाण्याची टाकी, पहिला मजला, सांगली ४१६४१६अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ दिवस (१२ जुलै २०२६)अधिकृत वेबसाईट – smkc.gov.inपदाचे नाव पद संख्यामुख्य अग्निशमन अधिकारी, श्रेणी-०१ 01
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य अग्निशमन अधिकारी, श्रेणी-०१ राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC), नागपूर किंवा अखील भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेशी संलग्न मान्यता प्राप्त विद्यापीठ (एआयसीटीई) यांच्याकडील अग्निशमन हा मुख्य विषय घेऊन अग्निशमन अभीयांत्रिकी पुर्ण केलेली पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणीक अर्हता.
किंवा
कोणत्याही शाखेतील पदवी व राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC), नागपूर यांच्याकडील विभागीय अग्निशमन अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (अग्निशमन प्रगत पदविका) किंवा युनाईटेड किंगडम, अग्निशमन अभीयांत्रिकी संस्था यांच्याकडील सदसत्व परीक्षा (एम.आय. अग्निशमन यु.के.) दि.०३.११.२०१७ पूर्वी उत्तीर्ण केलेली किंवा भारतीय अग्निशमन अभियांत्रिकी संस्था, नवी दिल्ली यांच्याकडील सदसत्व परीक्षा (एम.आय. अग्निशमन-इंडिया) दि.३१.०५.२०१३ पूर्वी उत्तीर्ण.
पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य अग्निशमन अधिकारी, श्रेणी-०१ एस-२० (५६१०० -१७७५००)
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१२ जुलै २०२६)आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For smkc.gov.in Bharti 2026PDF जाहिरात https://shorturl.at/K9pX6✅ अधिकृत वेबसाईट https://smkc.gov.in/Previous Postsमहापालिकेत सध्या कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 300 कर्मचार्यांना पदोन्नती मिळेल. त्यापैकी 50 कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर एप्रिलअखेर सुमारे 200 पदांवर नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त यांनी दिली. महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार कर्मचार्यांची पदसंख्या 3 हजार 445 झाली आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या पालिकेत 1390 कायम कर्मचारी कार्यरत आहेत, तर मानधन, बदली व रोजंदारीवर 1250 कर्मचारी आहेत. महापालिकेत मोठ्या प्रमाणात कायम कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीनंतर नोकरभरती प्रक्रिया सुरू होईल. महापालिकेत काही तांत्रिक पदांची भरती करण्यास शासनानेही मान्यता दिली आहे.पण त्यापूर्वी कार्यरत कर्मचार्यांतील पात्र कर्मचार्यांना पदोन्नती देत रिक्त पदे भरण्यात येत आहेत. पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिका कर्मचार्यांच्या नवीन आकृतिबंधात वर्ग 1 ते 4 मधील 481 पदे पदोन्नतीने भरायची आहेत. कर्मचार्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवाज्येष्ठता हे निकष तपासून पदोन्नती समितीत पदोन्नतीसाठी पात्र, अपात्र कर्मचार्यांची निवड होते. आयुक्त अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीत अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख यांचा समावेश आहे. आतापर्यंत शाखा अभियंता व कनिष्ठ लिपिक संवर्गातील 50 कर्मचार्यांची पदोन्नती समितीत मंजूर करण्यात आली आहे. अन्य कर्मचार्यांची प्रक्रिया सुरू आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. सुमारे 300 कर्मचार्यांना पदोन्नती मिळेल. पदोन्नतीनंतर एप्रिलअखेरीस नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल. शासनाने महापालिकेला 568 पदांवर भरतीची परवानगी दिलेली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.