'सीजेपी' प्रयोगावरून सुधीर मुनगंटीवारांचे मोठे विधान; सुप्रीम कोर्टातील 'त्या' प्रसंगाची करून दिली आठवण!
सुप्रीम कोर्टच्या माननीय न्यायमूर्तींना असं वाटलं की ते जे बोलताय ती छोटी गोष्ट आहे. मात्र ती छोटी गोष्ट नव्हती. तुम्ही जेव्हा देशातील तरुणांना अशी उपमा देता, तेव्हा तरुणांच्या मनात असा भाव हा जन्माला येतो आणि अशा भावातून तरुणांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. पण अशा प्रकारच्या प्रयोगाला एक योग्य दिशा आणि व्यवस्था लागते आणि अशा प्रकारची दिशा आणि व्यवस्था नसेल तर असा प्रयोग पर्याय ठरत नाही.
भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानातून ही व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे सीजेपी काही पर्याय ठरू शकत नाही. मात्र हे खर आहे की सीजेपीच्या या प्रयोगातून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे की, सामान्य माणसाचं मन दुखेल अशा शब्दांचा प्रयोग करायला नको, सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही. त्यातून हा प्रयोग जन्माला आला, त्यामुळे असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. असेमत भाजपचे जेष्ठनेतेआणिआमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. ते चंद्रपुरात बोलत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.